छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ४६ मंडळांत दुष्काळ जाहीर झाला. शासनाने ४० तालुक्यांव्यतिरिक्त १,०२१ मंडळांत नव्याने दुष्काळ जाहीर केला असून, त्यात जिल्ह्यातील मंडळांचा नव्याने समावेश झाला आहे. त्यात सात तालुक्यांमधील ४६ मंडळांचा समावेश करण्यात आला असून, ९२० गावांत दुष्काळसदृश परिस्थिती आहे. येणाऱ्या काळात या गावांमध्ये पाणीटंचाईची शक्यता आहे. एका मंडळात सरासरी २० गावांचा समावेश होतो. त्याआधारे जिल्ह्यातील ९२० गावांत दुष्काळसदृश परिस्थिती असणार आहे.
जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील ज्या महसुली मंडळांमध्ये जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत सरासरी ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे, अशा महसली मंडळांमध्ये दुष्काळसदश परिस्थिती घोषित करून सवलती लागू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबतचा अध्यादेश शासनाने १० नोव्हेंबर रोजी जाहीर केला.
पैठण तालुक्यातील आडूळ, बालानगर, नांदर, लोहगाव, ढोरकीन, बिडकीन, पैठण, पाचोड, पिंपळवाडी, विहामांडवा, फुलंब्री तालुक्यातील फुलंब्री, आळंद, पीरबावडा, वडोद बाजार, वैजापूर तालुक्यातील खंडाळा, शिऊर, बोरसर, लोणी खुर्द, गारज, लासरगाव. महालगाव. नागमठाण.
काय मिळणार लाभ?
जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडित कर्ज वसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या वीज बिलात ३३.५ टक्के सूट, शैक्षणिक शुल्क माफ, रोहयोंतर्गत कामांच्या निकषात शिथिलता, टँकरने पिण्याचे पाणी पुरविणे, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांची वीज खंडित न करणे आदी लाभ दुष्काळ जाहीर केलेल्या जिल्ह्यांतील मंडळांतर्गत मिळतील.
लाडगाव, गंगापूर तालुक्यातील गंगापूर, मांजरी, भेंडाळा, शेंदूरवादा, तुर्काबाद, वाळूज, हर्सल, सिद्धनाथ प. खुलताबाद तालुक्यातील वेरूळ, सुलतानपुरा, बाजरसावंगी या मंडळांत, सिल्लोड तालुक्यातील सिल्लोड, निल्लोड, भराडी, गोळेगाव, अजिंठा, आमठाणा, बोरगाव बाजार, कन्नड तालुक्यातील कन्नड, चापानेर, देवगाव रंगारी, चिकलठाणा, पिशोर, नाचनवेल, चिंचोली लिंबाजी, करंजखेड या मंडळांत दुष्काळसदृश परिस्थिती आहे.