Join us

Agriculture News : कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर येथे 96 वा भारतीय कृषि अनुसंधान परिषद स्थापना दिवस साजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 8:16 PM

Agriculture News : 96 वा भारतीय कृषि अनुसंधान परिषद स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

हिंगोली : भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली संत नामदेव सेवाभावी संस्था हिंगोली संचलित कृषि विज्ञान केंद्र तोंडापूर येथे 96 वा भारतीय कृषि अनुसंधान परिषद स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. पी.पी. शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

भारताचे केंद्रीय कृषि आणि शेतकरी कल्याण ग्रामविकास मंत्री मा. शिवराजसिंह चौहान यांनी 96  वा ICAR स्थापना दिवसा निमित्त केलेले मार्गदर्शन ऑनलाइन माध्यमाद्वारे कृषि विज्ञान केंद्र, तोंडापुर मध्ये दाखवण्यात आले. या कार्यक्रमांचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. पी पी. शेळके वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख यांनी भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांचे उद्देश, कार्य, शेतकऱ्यांसाठी विकसित होणाऱ्या नवीन तंत्रज्ञान ज्यामधे नवीन पिकांच्या विविध जाती, यांत्रिकीकरण व तसेच विविध संशोधन केंद्राचे कार्य सर्वांना अवगत करून दिले व सर्वांना ९६ वा ICAR स्थापना दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमांमध्ये डॉ. अतुल मुराई विषय विशेषज्ञ कृषी विस्तार यांनी भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांचा इतिहास, विविध राष्ट्रिय संशोधन केंद्र, भारत मध्ये असलेल्या ११ अटारी संस्थान, कृषि विज्ञान केंद्रे, विविध कृषि विद्यापीठे व तसेच शेती निगडित मोबाईल ॲप्लिकेशनची सविस्तर माहिती दिली. ९६ वा ICAR च्या स्थापना दिवसा निमित्त प्रकल्प संचालक आत्मा, हिंगोली आणि कृषि विज्ञान केंद्र, तोंडापुर अंतर्गत सेंद्रिय शेती या विषयांवर प्रशिक्षण सुद्धा आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. राजेश भालेराव विषय विशेषज्ञ कृषी विद्या अनिल ओळंबे विषय विशेषज्ञ उद्यान विद्या, अजय कुमार सुगावे विषय विशेषज्ञ पिक संरक्षण, रोहिणी शिंदे विषय विशेषज्ञ गृह विज्ञान, साईनाथ खरात विषय विशेषज्ञ मृदा विज्ञान, डॉ. कैलास गीते कार्यक्रम सहाय्यक पशु विज्ञान, विजय ठाकरे कार्यालय अधिक्षक, शिवलिंग लिंगे, मनीषा मुंगल, ओमप्रकाश गुडेवार, गुलाबराव सूर्यवंशी, मारुती कदम, संतोष हानवते, प्रेमदास जाधव व राघोजी नरवाडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आयोजन डॉ. अतुल मुराई विषय विशेषज्ञ कृषी विस्तार व आभार प्रदर्शन साईनाथ खरात विषय विशेषज्ञ मृदा विज्ञान यांनी केले.

टॅग्स :हिंगोलीशेती क्षेत्रशेतीशेतकरी