Join us

पावसाची विश्रांती; पेरणीला वेग, यंदा कोणत्या पिकाचा पेरा वाढू शकतो?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 1:10 PM

४२.५० टक्के पेरण्या पूर्ण; समाधानकारक पावसामुळे बळीराजा आनंदला

तुळजापूर तालुक्यात जून महिन्यामध्ये सरासरी २३१ मिमी पाऊस पडल्याने शेतकऱ्यात उत्साह असून, दोन ते तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे खरिपाच्या पेरणीला गती आली आहे.

तालुक्यात गतवर्षी पावसाने दडी मारल्याने हंगामात ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागले. गतवर्षी मुबलक प्रमाणात पाऊस न झाल्याने गतवर्षीपासून ते आजतागायत ग्रामीण भागातील नागरिकांना विहीर, बोअर अधिग्रहणावर तहान भागवावी लागत आहे. पर्यायी विहिरी व कूपनलिकांचे पाणी आटल्याने रब्बीसह उन्हाळी हंगामातही शेतकऱ्यांना नुकसानीचा बळीराजाने पुन्हा नव्या जोमाने व आशेने उभा राहून हंगामपूर्व शेती कामे पूर्ण केली. तालुक्याच्या विविध भागामध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे.

मागील काही दिवसांत पडलेल्या पावसानंतर गेली तीन दिवसांपासून शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केली असून, आतापर्यंत ४० हजार ८०९ आहेत. यात ३१ हजार ४०० हेक्टरवर सोयाबीन, १ हजार ९०० हेक्टरवर उडीद, १ हजार ९०० हेक्टरवर मूग, २ हजार ६०० हेक्टरवर तूर, १० हेक्टरवर मका तर ४३ हेक्टरवर बाजरीचा पेरा झाला

मृग नक्षत्रातील पाऊस चांगला झाल्याने गेली चार ते पाच वर्षानंतर मृगाच्या पावसावर पेरणी होत आहे. सोयाबीन, उडीद, मुगाच्या पेरणीसाठी पोषक असा पाऊस पडला असून, पेरण्याही वेळेत होत आहेत. यंदा सोयाबीनचा पेरा वाढू शकतो. - अरीफ शेख, शेतकरी, तडवळा

जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मध्यम स्वरूपाच्या पावसावर मी पेरणी केली. पिकांची उगवण क्षमताही चांगली आहे. यंदा जून महिन्यात पावसाने चांगली सुरुवात केली आहे. - नितीन जाधव, शेतकरी, धनेगाव

टॅग्स :पेरणीलागवड, मशागतपाऊस