टोमॅटोला सोन्याचा भाव आल्याने शेतातील कच्चे टोमॅटोही चोरीला जाऊ लागले आहेत. टोमॅटो विक्रीतून अनेक शेतकरी करोडपती झाले आहेत. मात्र, चोरांचीही वक्रदृष्टी टोमॅटोवर पडली आहे. त्यामुळे टोमॅटोची राखण करण्यासाठी गंगापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याने चक्क २२ हजार रुपये खर्चून शेतात सीसीटीव्ही बसविले आहेत. यामुळे हा शेतकरी सध्या राज्यात चर्चेत आला आहे.
टोमॅटोचे दर गगनाला भिडल्याचे चित्र असताना आता चोरीच्या भीतीने शेतकऱ्यांनी टोमॅटोची सुरक्षा वाढली आहे. सध्या देशातील काही भागात टोमॅटो १०० ते २०० रुपये किलो तर काही भाजी मंडईत ३०० रुपये किलोच्या भावाने विकला जात आहे. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी टोमॅटो कडेकोट सुरक्षेत ठेवले आहे. त्यासाठी सीसीटीव्हीचा आधार घेण्यात येत आहे. तर काही ठिकाणी टोमॅटोला सुरक्षित ठेवण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर मधील गंगापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याने टोमॅटोच्या शेतात सीसीटीव्हीसीसी कामेरा बसवला आहे.
टोमॅटोची विक्री करून काही शेतकरी करोडपती झाल्याचेही समोर आले आहे. एरव्ही शेतकऱ्याचा पिकाला कवडीमोल भाव मिळायचा पण आता टोमॅटोचे वाढते दर पाहता शेतकरीही मालामाल झाल्याचे चित्र आहे. महिनाभरापासून टोमॅटोच्या दरात वाढ होत असताना येत्या काही दिवसांत तो ३०० रुपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता घाऊक व्यापाऱ्यांनी व्यक्त केली जात आहे.