Lokmat Agro >शेतशिवार > सप्टेंबरअखेर तरी दुष्काळ जाहीर करता येणार नाही; वरूणराजाची कृपा होऊन तूट भरुन निघण्याची अजूनही आशा

सप्टेंबरअखेर तरी दुष्काळ जाहीर करता येणार नाही; वरूणराजाची कृपा होऊन तूट भरुन निघण्याची अजूनही आशा

A drought cannot be declared at the end of September; There is still hope that the deficit will be covered by the grace of Varunaraja | सप्टेंबरअखेर तरी दुष्काळ जाहीर करता येणार नाही; वरूणराजाची कृपा होऊन तूट भरुन निघण्याची अजूनही आशा

सप्टेंबरअखेर तरी दुष्काळ जाहीर करता येणार नाही; वरूणराजाची कृपा होऊन तूट भरुन निघण्याची अजूनही आशा

राज्याच्या विविध भागातून विशेषतः अखेरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत दुष्काळ किंवा अतिवृष्टीच्या मागील अतिवृष्टीच्या काळातील मदत नाही. त्यासाठी सप्टेंबर अखेरपर्यंत त्यानंतर ...

राज्याच्या विविध भागातून विशेषतः अखेरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत दुष्काळ किंवा अतिवृष्टीच्या मागील अतिवृष्टीच्या काळातील मदत नाही. त्यासाठी सप्टेंबर अखेरपर्यंत त्यानंतर ...

शेअर :

Join us
Join usNext

राज्याच्या विविध भागातून विशेषतः अखेरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत दुष्काळ किंवा अतिवृष्टीच्या मागील अतिवृष्टीच्या काळातील मदत नाही. त्यासाठी सप्टेंबर अखेरपर्यंत त्यानंतर ऑक्टोबरअखेरीस ती जून-जुलैमध्ये सरासरीच्या मुंबई : राज्यात ऑगस्ट महिन्यात पावसाने दिलेली ओढ सप्टेंबर चा पहिला आठवडा सुरू झाला तरी कायम आहे. पिके करपू लागल्याने राज्याच्या विविध भागातून विशेषतः मराठवाड्यातून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होऊ लागली आहे. मात्र दुष्काळ जाहीर करण्याच्या निकषांनुसार सरकारला सप्टेंबर अखेरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत दुष्काळ जाहीर करता येणार नाही. सप्टेंबर मध्ये वरून राजाची कृपा होऊन राहिलेली तूट भरून निघेल अशी आशा अजूनही बाळगली जात आहे.

दुष्काळ किंवा अतिवृष्टीच्या काळात पिकांच्या झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून मदत व पुनर्वसन विभागाकडून त्यासाठीची मदत जाहीर केली जाते. त्यानुसार मागील अतिवृष्टीच्या काळातील मदत जाहीर करण्यात आली आहे. मात्र सध्या राज्याची परिस्थिती पाहता पावसाने ओढ दिली असली तरी दुष्काळ मात्र जाहीर करता येणार नाही. त्यासाठी सप्टेंबर अखेरपर्यंत किती आणि कोणत्या भागात पाऊस पडतोय हे पहावे लागेल. तसा पाऊस ज्या जिल्ह्यांना होणार नाही त्यांचा आढावा सप्टेंबर अखेर घेतला जाईल. त्यानंतर ऑक्टोबर अखेरीस तशी परिस्थिती असल्यास तालुका निहाय दुष्काळ जाहीर केला जाऊ शकतो असे मदत व पुनर्वसन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. जून जुलैमध्ये सरासरीच्या 50 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्यास व संपूर्ण पावसाळ्यात 75% पेक्षा कमी पाऊस झाल्यास दुष्काळ जाहीर केला जाण्याची शक्यता असते.

Web Title: A drought cannot be declared at the end of September; There is still hope that the deficit will be covered by the grace of Varunaraja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.