शंकर पोळकोपर्डे हवेली : 'मुलाला शेती पाहिजे; पण तो शेतकरी नवरा नको आहे. पुणे, मुंबई किंवा इतर ठिकाणी नोकरी करणारा असावा. शहरात स्थायिक असावा. मोठा रोहाऊस किंवा फ्लॅट असावा, अशी मानसिकता मुलींबरोबर त्यांच्या मातापित्याची झाली आहे तर मुलाचे लग्न ठरत नसल्याने शेतकरी मातापित्याच्या जिवाला घोर लागला आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांची अवस्था मुलांचे विवाह जमत नसल्याने बिकट झाली आहे.
मुला, मुलींच्या जन्मदरात विषमता याचे मूळ कारण असले तरी या गोष्टीला इतरही कारणे कारणीभूत आहेत. गेल्या पंचवीस-तीस वर्षांपूर्वी लोकांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. उत्तम शेती आणि दुय्यम नोकरी अशी परिस्थिती होती; पण अलीकडच्या काही वर्षांत वेगाने काळ बदलला. मुली म्हणजे परक्याचे धन, अशी मानसिकता झाली.
त्यातून स्त्रीभ्रूणहत्या झाल्या आणि मुलींचा जन्मदर घटला. त्याचे परिणाम गेल्या काही वर्षांपासून भोगावे लागत आहेत. त्याचा सर्वात जास्त फटाका शेतकरी कुटुंबातील मुलांना बसला. नैसर्गिक अवकृपा आणि मानवनिर्मित नियोजनाअभावी शेती व्यवसाय तोट्यात गेला. शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत गेला.
शेतकरी कुटुंबातील मुलीचे लग्न करायचे झाले त्यातून स्त्रीभ्रूणहत्या झाल्या आणि मुलींचा जन्मदर घटला. त्याचे परिणाम गेल्या काही वर्षांपासून भोगावे लागत आहेत. त्याचा सर्वात जास्त फटाका शेतकरी कुटुंबातील मुलांना बसला. नैसर्गिक अवकृपा आणि मानवनिर्मित नियोजनाअभावी शेती व्यवसाय तोट्यात गेला.
शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत गेला. शेतकरी कुटुंबातील मुलीचे लग्न करायचे झाले लग्ने रखडली. अनेक मातापित्यांच्या मुलाचे लग्न होत नाही म्हणून जीव झुरणीला लागला. जन्मपत्रिका दाखवून ग्रहणाचे ज्योतिषकडून उपाय केले तरी लग्नाचे योग येत नाहीत. पै-पाहुणे लक्ष देत नाहीत. अशी अवस्था झाल्याने संपूर्ण घराचे सदस्य काळजीत असल्याचे चित्र दिसत आहे. दुसरी बाजू अशीही आहे. नोकरी आहे, तर जमीन नाही. अशीही लग्ने रखडले आहेत.
तोट्यातील शेती फायद्यात येईलगावोगावी शेतीचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे. नोकरी आज आहे तर उद्या नाही. जमीन पिढ्यान् पिढ्या राहणार आहे. शेती तोट्यात असणारी भविष्यात फायद्यात येईल तर मुलींनी स्वतः पुढे येऊन शेतकरी मुलाला लग्नाला होकार दिला पाहिजे. यासाठी प्रबोधनाची गरज निर्माण झाली आहे. यासाठी वधू-वर सूचक मंडळांनी पुढे येऊन सामाजिक बांधिलकी म्हणून हे काम केले पाहिजे.
चार महिने पायाला भिंगरीतुलसी विवाह झाल्यानंतर मुलामुलीच्या लग्नासाठी स्थळे पाहण्यासाठी सुरुवात केली जाते. चार महिने पायाला भिंगरी लावून मुलीच्या शोधात पिता असतो; पण अपयश येते, असे प्रत्येक वर्षी सुरु असते. मुलांचे वय वाढते आहे. या काळजीत कुटुंब असते. मुलींच्या घरच्यांना मदत करण्यास अनेक असतातः पण अपयश येत असल्याने पिता खचून गेल्याचे चित्र दिसत आहे.
माझे वधू-वर सूचक केंद्र नाही, सेवा म्हणून लग्न जुळवण्याचे काम करतो. यामध्ये अनेक अडचणी आहेत. मुलींच्या तुलनेत मुलांचे बायोडेटा जास्त आहेत. मुर्लीचे वडील शेती, नोकरी, कुळी, पत्रिका आदी गोष्टींचे नियम लावत असल्याने वर्षाकाठी एखादे दुसरे लग्न जमवण्यात यश येत आहे. मुलामुलीच्या विषमतेचे मूळ कारण हेच आहे. - प्रदीप पोळ, शामगाव