Lokmat Agro >शेतशिवार > तरुणांना दरमहा १० हजार रूपये कमविण्याची सुवर्णसंधी राज्य सरकारच्या या योजनेची ऑनलाईन नाव नोंदणी सुरु

तरुणांना दरमहा १० हजार रूपये कमविण्याची सुवर्णसंधी राज्य सरकारच्या या योजनेची ऑनलाईन नाव नोंदणी सुरु

A golden opportunity for youth to earn 10 thousand rupees per month online name registration of this scheme of the state government has started | तरुणांना दरमहा १० हजार रूपये कमविण्याची सुवर्णसंधी राज्य सरकारच्या या योजनेची ऑनलाईन नाव नोंदणी सुरु

तरुणांना दरमहा १० हजार रूपये कमविण्याची सुवर्णसंधी राज्य सरकारच्या या योजनेची ऑनलाईन नाव नोंदणी सुरु

Yojana Doot Bharti शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

Yojana Doot Bharti शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

मुंबई : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे.

या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील.

पात्रता
१) या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा.
२) उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे.
३) उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
४) उमेदवारास संगणक ज्ञान असावे. 
५) अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आवश्यक.
६) आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे
१) मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज.
२) आधार कार्ड.
३) पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे/प्रमाणपत्र इ.
४) अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला)
५) उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा.
६) पासपोर्ट आकाराचा फोटो.
७) हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख
१३ सप्टेंबर २०२४

अर्ज कुठे कराल?
इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.

Web Title: A golden opportunity for youth to earn 10 thousand rupees per month online name registration of this scheme of the state government has started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.