A healthy tree : पावसाळा सुरु झाला की, प्रत्येक जाण आपल्या घर आणि परसबागेची शोभा वाढविण्यासाठी विविवध प्रकारची झाडे लवण्याकडे वळतात. आपल्या घराची शोभा वाढविण्यासाठी घर आणि परसबागेत विविध प्रकारच्या झाडांची लागवड केली जाते. झाडांमुळे घर आणि परिसरातील झाड आपले मन प्रसन्न करण्यास मोठा वाटा असतो. यात रबर प्लांट, मनी प्लांट, तुळस, गुलाब, अशोका अशा विविध झाडांची लागवड करण्यावर सर्वाधिक भर दिला जात आहे.
असे असले तरी काही झाडे ही घराच्या आतमध्ये सावलीत वाढतात तर काही झाडे सावलीत वाढत नाहीत. त्यामुळे झाडे लावताना झाडांच्या वाढीचा, त्यांच्यापासून होणारे फायदे या सर्वच बाबींचा विचार केला जात आहे.
यात बोन्साय झाडांना देखील पसंती मिळते. विशेष म्हणजे सर्वाधिक ऑक्सिजनचा पुरवठा करणारे पिंपळ, कडुनिंब, वड, जांभूळ, तुळस, अशोकाची, बेलाची झाडे यांची जास्त लागवड करतात. तर घरात मनी प्लांट, रबर प्लांट, स्पायडर प्लांट, सेक प्लांट अशी झाडे कमी उंचीची आणि सहज वाढणारी झाडे मोठ्या प्रमाणावर लावली जातात.
यंदा 'या' रोपांना मागणी
पिंपळ : पिंपळाचे झाड हे सर्वाधिक ऑक्सिजन देणारे झाड आहे. त्यामुळे वृक्षारोपण करणाऱ्यांकडून पिंपळाच्या रोपाला अधिक मागणी आहे.
चिंच : चिंचेचे झाड सावली देण्यासोबतच उत्पन्नदेखील देत असल्याने चिंचेच्या रोपांना मागणी मिळते.
गुलाब : गुलाबांच्या रोपांना नेहमीच मोठ्या प्रमाणावर मागणी असते. मात्र शिर्डी गुलाबाची फुले जास्त काळ टिकतात. त्यामुळे या गुलाबाच्या झाडाला जास्त मागणी आहे.
वड : वडाचे झाड मोठे आणि विस्तीर्ण होते. त्यामुळे वडाच्या झाडालादेखील वृक्षप्रेमींकडून मोठी मागणी आहे.
कडुनिंब : कुठल्याही हवामानात तग धरून राहणारे आणि ऑक्सिजन देणारे झाड म्हणून मागणी आहे.
जास्त ऑक्सिजन देणारी झाडं
आज प्राणवायूसाठी शहराबाहेर जावे लागते. मात्र वड, पिंपळ, कडुनिंब, जांभूळ आणि अशोकाची झाडे जास्त ऑक्सिजनचा पुरवठा करतात.
घरात व नजीकची झाडे कोणती?
प्रत्येकाच्या घरात आवडीनुसार वेगवेगळी झाडे लावतात. यामध्ये मनी प्लांट, रबर प्लांट, स्पायडर प्लांट, नेक प्लांट, अशी झाडे लावली जातात.
विक्रीत गुलाब 'राजा'
घरात आणि अंगणातील परसबागेत गुलाबाचे झाड नाही, असे कधीच होत नाही. त्यामुळे विक्रीतही गुलाबच 'राजा' आहे.
दाट सावली हवीय? मग ही झाडं लावा
घर आणि परिसरात शोभणाऱ्या झाडांसोबतच जास्त सावली देणारे वड, पिंपळ, औंदुबर, कडुनिंब, आंबा, चिंच, करंजी, बदाम ही झाडे डेरेदार असल्याने जास्त सावली देतात. त्यामुळे ही झाडे लावण्यासाठी विचार केला जातो.
आंगणातील झाडं कोणती?
जास्त प्राणवायू देणारी तुळस, गुलाब, चाफा, चंपा, चमेली, मोगरा, जास्वंद या शोभिवंत झाडांना मागणी आहे.
भविष्यातील विचार करुन वृक्षारोपन
लोक केवळ झाडे लावत नाहीत तर त्यासाठी कुठली आणि कोणती झाडे लावायची, त्याचा भविष्यातील फायदा अशा सर्वच बाबींचा विचार करून त्यांची लागवड करतात.
- सुदाम म्हस्के, नर्सरीचालक.