नागपूर : ३० सप्टेंबरला कापूस खरेदी वर्ष संपले आणि १ ऑक्टाेबर २०२२ ते ३० सप्टेंबर २०२३ या काळात देशभरात ३४३.४७ लाख गाठी कापूसबाजारात आला, असा दावा काॅटन असाेसिएशन ऑफ इंडियाने (सीएआय) केला आहे. दुसरीकडे, याच काळात ३१५.०४७ लाख गाठी बाजारात आल्याचे इंडियन कमाेडिटिजचे म्हणणे आहे. मुळात उत्पादनाच्या चुकीच्या अंदाजामुळे दर दबावात येत असून, कापूस उत्पादकांचे गणित बिघडत असल्याचा आजवरचा अनुभव आहे.
या हंगामाच्या सुरुवातीला देशात ३६५ लाख गाठी कापसाचे उत्पादन हाेणार असल्याचा अंदाज सीएआयने व्यक्त केला हाेता. नंतर त्यांनी पिकाचे नुकसान व बाजारातील कापसाची आवक विचारात घेत अंदाज कमी केला. शेवटी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात देशभरात ३१५ लाख गाठी कापसाचे उत्पादन हाेणार असल्याचा अंदाज सीएआयचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी व्यक्त केला हाेता. मग केवळ १५ दिवसांत २८.४७ लाख गाठी बाजारात आल्या कुठून, असा प्रश्न बाजारतज्ज्ञांनी उपस्थित केला आहे. कापूस उत्पादनाच्या या आकड्यांवर अनेकांशी संशय व्यक्त केला असून, याचा वापर कापसाचे दर पाडण्यासाठी केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
आकड्यांचा घाेळ१ ऑक्टाेबर २०२१ ते ३० सप्टेंबर २०२२ या काळात देशभरात एकूण २९८.०९७ लाख गाठी कापूस बाजारात आला असताना सीएआयने या काळात ३२२.४१ लाख गाठी कापूस बाजारात आल्याचे जाहीर केले हाेते. १ ऑक्टाेबर २०२२ ते ३० सप्टेंबर २०२३ या काळात ३१५.०४७ लाख गाठी कापूस बाजारात आला असताना सीएआयने ३४३.४७ लाख गाठी कापूस बाजारात आल्याचा दावा केला आहे.
मिल मालक चुकीच्या कापूस उत्पादनाचे आकडे व कॅरी फाॅरवर्ड स्टाॅकचा वापर कापसाचे भाव पाडण्यासाठी करतात. कॅरी फाॅरवर्ड स्टाॅक कमी राहण्यासाठी कापूस निर्यातीला सबसिडी देणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने तसे धाेरण जाहीर करावे. - विजय जावंधिया, ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ
सीएआय कापूस बॅलेन्स शीट (आकडे लाख गाठींमध्ये)सन २०२२-२३ - सन २०२१-२२पुरवठाओपनिंग स्टाॅक - ३९.४८ - ७१.८४क्राॅप - ३४३.४७ - ३११.१७आयात - १०.०० - २१.१३एकूण पुरवठा - ३९२.९५ - ४०४.१४मागणीनाॅन एमएसएमई - १९४.७० - २२२.४१एमएसएमई - १००.३० - ९०.००नाॅन टेक्सटाईल - १६.०० - १०.००निर्यात - ३०.०० - ४२.२५एकूण मागणी - ३४१.०० - ३६४.६६क्लाेसिंग स्टाॅक - ५१.९५ - ३९.४८
कापसाचे उत्पादन (आकडे लाख गाठींमध्ये)राज्य - सीएआय - इंडियन कमाेडिटिज१) पंजाब - ४.६० - २.६७४२) हरयाणा - १०.०० - १०.७६३) राजस्थान - २७.७४ - २८.४९६४) गुजरात - ९४.९७ - ९३.०७०५) महाराष्ट्र - ८४.०९ - ८०.७३०६) मध्य प्रदेश - १७.२२ - १९.६००७) तेलंगणा - ५३.१३ - ३०.४६०८)आंध्र प्रदेश - १५.७९ - १५.५५१९) कर्नाटक - २५.४१ - २१.६९२१०) तामिळनाडू - ३.५६ - ६.४१४११) ओडिशा - ६.६५ - ३.३००१२) इतर - ०.३१ - २.३००१३) एकूण - ३४३.४७ - ३१५.०४७