Lokmat Agro >शेतशिवार > A textile park : सौर ऊर्जेच्या वापरातून उभारणार टेक्स्टाईल पार्क 

A textile park : सौर ऊर्जेच्या वापरातून उभारणार टेक्स्टाईल पार्क 

A textile park will be built using solar energy  | A textile park : सौर ऊर्जेच्या वापरातून उभारणार टेक्स्टाईल पार्क 

A textile park : सौर ऊर्जेच्या वापरातून उभारणार टेक्स्टाईल पार्क 

A textile park : अमरावतीतील पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्कच्या पर्यावरण विषयक मंजुरीसाठी पाठपुरावा केला जात आहे. 

A textile park : अमरावतीतील पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्कच्या पर्यावरण विषयक मंजुरीसाठी पाठपुरावा केला जात आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

A textile park :  अमरावती येथील नांदगाव पेठजवळ उभारण्यात येत असलेला ''पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क'' हा राज्यातील वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी महत्वपूर्ण प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या पर्यावरण विषयक मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याच्या हालचाली सध्या शासन दरबारी सुरु आहेत.  


अमरावती येथील पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क संदर्भात ३१ जुलै रोजी मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री द्रेवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार रवी राणा, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव रोहित कन्सल, सहसचिव प्राजक्ता लवंगारे, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव सौरभ विजय, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, वस्त्रोद्योग विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, अमरावतीतील पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्क हा जागतिक दर्जाचा व्हावा, अशी प्रधानमंत्री यांची इच्छा आहे. त्यानुसारच येथे सुविधा निर्माण कराव्यात. या ठिकाणी जागतिक दर्जाचे गुंतवणुकदार येण्यासाठी त्यांना त्या प्रकारच्या सोयी सवलती देण्यात याव्यात. तसेच येथील उद्योगांना सौर ऊर्जेसाठी सवलती देण्यासंदर्भात संबंधित ऊर्जे विभागाशी चर्चा करावी, अशी सुचना देण्यात आल्या आहेत. 

या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार असून त्यातून स्थानिकांना रोजगार निर्मितीही होणार आहे. या प्रकल्पाची पर्यावरण विषयक मंजुरी घेऊन पायाभूत कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, जेणेकरून प्रकल्प कार्यान्वित होईल, असेही फडणवीस यांनी सांगितले. यावेळी शर्मा यांनी पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कच्या सद्यस्थितीसंदर्भात सादरीकरण केले. 

१०२० हेक्टर जागेवर उभारण्यात येणार 

पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क हे अमरावतीत सुमारे १०२० हेक्टर जागेवर उभारण्यात येणार आहे.  यासाठीची सर्व प्रक्रिया झाली असून पर्यावरण मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.  हा ग्राऊंड फिल्ड प्रकल्प असून यामध्ये वस्त्रोद्योग संबंधी प्रशिक्षण, इन्क्युबेशन सेंटर, पायाभूत सुविधा, आवास प्रकल्प आदी सुविधा असणार आहेत. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास अंमलबजावणी संस्था म्हणून मान्यता मिळाली आहे.

 

Web Title: A textile park will be built using solar energy 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.