Lokmat Agro >शेतशिवार > घटस्थापनेमागे लपलंय शेतीचं अनोखं तंत्र!

घटस्थापनेमागे लपलंय शेतीचं अनोखं तंत्र!

A unique technique of agriculture is hidden behind Ghatsthana! | घटस्थापनेमागे लपलंय शेतीचं अनोखं तंत्र!

घटस्थापनेमागे लपलंय शेतीचं अनोखं तंत्र!

शेतीच्या दृष्टीनं घटस्थापनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. घटस्थापना ही पावसाळ्याच्या शेवटच्या दिवसात आणि रब्बी पिकांचा हंगाम सुरू होण्याच्या आधी केली जाते.

शेतीच्या दृष्टीनं घटस्थापनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. घटस्थापना ही पावसाळ्याच्या शेवटच्या दिवसात आणि रब्बी पिकांचा हंगाम सुरू होण्याच्या आधी केली जाते.

शेअर :

Join us
Join usNext

पितृपक्ष संपताच शारदीय नवरात्रीला सुरुवात होते. नवरात्री उत्सवाच्या पहिल्याच दिवशी घटस्थापना केली जाते. शेतीच्या दृष्टीनं घटस्थापनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. घटस्थापना ही पावसाळ्याच्या शेवटच्या दिवसात आणि रब्बी पिकांचा हंगाम सुरू होण्याच्या आधी केली जाते. सातारा जिल्ह्यात शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातही घटस्थापनेची परंपरा आजही पाहायला मिळते.

घटस्थापना धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची मानली जात असली तरी देखील ही एक कृषी आधारित वैज्ञानिक संकल्पना आहे.दृष्टिकोन असणारी पद्धती आहे. घटस्थापना करताना प्रथम एक पळसाच्या पानाची पत्रावळी ठेवली जाते. त्यावर शेतातील काळी माती केवली जाते या मातीत विविध प्रकारचे बियाणे मिसळले जाते. त्यावर एक कच्च्या मातीचा घट ठेवला जातो. या घटामध्ये नऊ दिवस रोज पाणी घातले जाते. नवव्या दिवशी तळी उचलून घटाचे विसर्जन केले जाते.

घटस्थापनेसाठी शहरी भागात बाजारात मिळणारी माती वापरली जाते; परंतु ग्रामीण भागातील शेतकरी मात्र आपल्याच शेतातील माती घटासाठी वापरतो. कारण ज्या शेतात तो पीक घेणार आहे. त्या शेतातील मातीचे हे परीक्षण असते. रब्बी हंगामात जे पीकशेतकरी त्याच्या शेतात पेरु शकतो असे बियाणे घटात टाकले जाते. नऊ दिवसांच्या परीक्षणानंतर घटात ज्या पिकाची उगवण क्षमता अधिक आहे, असेच पीक शेतकरी आपल्या शेतात पेरत असतो.

शहरी भागात घटस्थापनेला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे त्यामुळे घटात नऊ दिवस जे पाणी घातले जाते घरात उपलब्ध असलेले पाणी असते, तर शेतकरी शेतीसाठी जे पाणी वापरतो त्याचाच वापर तो घटासाठी नऊ दिवस करत असतो.

मातीचाच घट का?
- घटस्थापनेसाठी जो घट वापरला जातो तो मातीपासून बनवलेला असतो. त्यामागेही एक कारण आहे. मातीच्या घटात ओतलेले पाणी सातत्याने पाझरत असते.
- हे पाणी घटाच्या खाली असलेल्या माती आणि बियाणासाठी पोषक असते. रपून येणाऱ्या पाण्यावरच घटातील बियाणे उगवून येतात.
- नऊ दिवसानंतर घट उचलला जातो. जे पीक जोमाने आले आहे ते पीक शेतकरी शेतात पेरण्यासाठी निवडतो. शहरी भागात घटस्थापनेला धार्मिकतेची जोड असली तरी ग्रामीण भागात मात्र या उत्सवामागे शेतीचं अनोखं तंत्र लपलं आहे.

दुर्गोत्सवाला उत्सवाचे स्वरूप
नवरात्रीमध्ये सर्वत्र सजावट पाहायला मिळते. मोठे-मोठे मंडप बघायला मिळतात. विविध सार्वजनिक मंडळातर्फे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन जाते. स्त्रिया, पुरुष तसेच लहान मुलं दांडिया, गरबा खेळताना दिसतात. विविध स्पर्धामध्ये सहभागी होतात. या नऊ दिवशी सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. अलीकडच्या काही वर्षांत नवरात्र उत्सवाला उत्सवाचे स्वरूप आले आहे.

सचिन काकडे

Web Title: A unique technique of agriculture is hidden behind Ghatsthana!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.