Lokmat Agro >शेतशिवार > आधार अपडेट ते अग्रीम आयकर; पुढच्या वर्षावर ढकलू नका ही कामे, अन्यथा...

आधार अपडेट ते अग्रीम आयकर; पुढच्या वर्षावर ढकलू नका ही कामे, अन्यथा...

Aadhaar Update to Advance Income Tax; Don't postpone these works for next year.. | आधार अपडेट ते अग्रीम आयकर; पुढच्या वर्षावर ढकलू नका ही कामे, अन्यथा...

आधार अपडेट ते अग्रीम आयकर; पुढच्या वर्षावर ढकलू नका ही कामे, अन्यथा...

हे काम राहिले तर फोन पे किंवा पेटीएमचा युपीआय होणार निष्क्रीय..

हे काम राहिले तर फोन पे किंवा पेटीएमचा युपीआय होणार निष्क्रीय..

शेअर :

Join us
Join usNext

डिसेंबर हा यावर्षीची अखेरचा महिना आहे. आर्थिक घडामोडींच्या दृष्टीने हा महिना महत्त्वाचा आहे. अनेक महत्त्वपूर्ण कामे या डिसेंबरमध्ये उरकून घ्या. त्यात दिरंगाई झाल्यास बराच त्रास सहन करावा लागू शकतो. ही कामे कोणती? जाणून घेऊ या....

म्युच्युअल फंडातील नामांकन आवश्यक

म्युच्युअल फंडाच्या फोलिओमध्ये नामांकन जोडणे बंधनकारक आहे. यासाठी ३१ तारखेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. नामांकन नसेल तर १ जानेवारीपासून फोलिओतून विक्री व इतर व्यवहार करता येणार नाही.

आधारचे अपडेट

आधार कार्ड काढून १० वर्षे झाली आणि एकदाही त्यातील माहिती अपडेट केलेली नाही, अशा लोकांसाठी १४ डिसेंबरपर्यंत मोफत अपडेट करण्याची मुदत आहे. ऑनलाइन अपडेट मोफत करता येईल. त्यानंतर अपडेट केल्यास शुल्क आकारण्यात येईल. आधार कार्ड ऑनलाइन अपडेट करण्यासाठी तुम्ही myaadhaar.uidai.gov.in ला भेट देऊ शकता. 14 डिसेंबरपर्यंत आधार अपडेट करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. 

अग्रीम आयकर भरणा व आयकर विवरण

ज्यांचे आयकर दायित्व १० हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. अशा करदात्यांना अग्रीम कर भरावा लागतो. अग्रीम कराचा तिसरा हप्ता भरण्यासाठी डिसेंबरची मुदत आहे. १५ डिसेंबरपूर्वी करदात्यांना ७५ टक्के अग्रीम कर भरणे बंधनकारक आहे. सुधारित आयकर भरणे किंवा आयकर भरण्यास उशीर झाला असेल तर ३१ डिसेंबरपर्यंत मुदत आहे. ठराविक दंड भरून हे काम करता येईल,

याकडेही लक्ष असू द्या

अनेक बँकांमध्ये लॉकर सुविधा घेणाऱ्यांना डिसेंबरमध्ये कराराचे नूतनीकरण करावे लागते. ते करून घ्या.आरबीआय ८ तारखेला पतधोरण जाहीर करणार आहे.

यूपीआय आयडी होईल निष्क्रीय

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने गुगल पे, फोन पे किंवा पेटीएमला एका वर्षापेक्षा जास्त काळ सक्रिय नसलेले यूपीआय आयडी निष्क्रिय करण्यास सांगितले आहे. याकरता 31 डिसेंबर 2023 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.अशी निष्क्रिय खाती पुन्हा सुरू केली जाऊ शकतात. परंतु यासाठी किमान एक व्यवहार करणे आवश्यक आहे.

Web Title: Aadhaar Update to Advance Income Tax; Don't postpone these works for next year..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.