Join us

अबब... गाढविणीचे दूध दोन हजार रुपये लिटर !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 3:00 PM

दुधात औषधी गुणधर्म : पशुसंवर्धन अधिकाऱ्यांकडून दुजोरा

सर्दी, खोकला आणि किडनीचा आजार बरा होतो, असा दावा करीत गेल्या काही दिवसांपासून लातूर शहरात एक महिला आणि एक पुरुष गल्लीबोळांत भोंगा लावून गाढविणीचे दूध विक्री करत आहेत. याला तितकासा प्रतिसाद मिळत नसला तरी काही जाणकार हे दूध घेऊन लहान मुलांना पाजत आहेत.

रोगमुक्त करणारे दूध असल्याचा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांशी संपर्क दुधात औषधी गुणधर्म असल्याला दुजोरा दिला आहे. लातूर जिल्ह्यामध्ये दावा खरा की खोटा, या अनुषंगाने तीन वर्षांच्या खाली ११९ गाढवांची मादी जाती गाढवांची ९६ संख्या आहे. ५९ मादी दूध देणाऱ्या आहेत. मंगळवारी बसवंतपूर येथे दूध विकणारी संख्या आहे, तर तीन वर्षांच्या पुढे वय साधला असता त्यांनीही गाढविणीच्या असलेल्या गाढवांची संख्या २१८ आहे. गाढवांची संख्या आहे. जिल्ह्याच्या रोगप्रतिकारशक्ती अधिक असते. जागेवर धार काढून अर्धा लिटरपर्यंत नर जातीचे गाढव ३३७, तीन वर्षांच्या खालील मादी जातीचे ५९, तर पुढील जिल्ह्यात नर मादी मिळून ४३८ गाढविणीच्या पशुसंवर्धन विभागाकडे ही नोंद आहे.

गाढविणीच्या दुधामध्ये रोगप्रतिकारशक्ती असते. अस्थमा सतत होणारी सर्दी, खोकला, ताप, पोटाचे विकार, पचनशक्तीत सुधारणा, आतड्यांचे विकार तसेच सतत होणारी सर्दी यावर रामबाण उपाय म्हणून गाढविणीचे दूध घेतले जाते. या दुधामुळे अनेक जिवाणू व विषाणू रोखण्यास मदत होते. त्याचा फायदा मनुष्यप्राण्याला होतो. विशेष म्हणजे मानवी दुधापेक्षा ६० टक्क्यांपर्यंत जास्त जीवनसत्त्वे यात असतात. या दुधापासून सौंदर्यप्रसाधनेही तयार होऊ लागली आहेत. परंतु, याची विक्री कोठे होते याची माहिती नाही. - डॉ. राजकुमार पडिले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी

ताप, संसर्गजन्य, पोटाचे विकार, आतड्यांचे विकार, हृदयरोग टाळण्यासाठी, तसेच पचनक्रिया सुधारण्यासाठी गाढविणीच्या दुधाचा वापर वाढला असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच की काय, गेल्या काही दिवसांपासून लातूर शहरामध्ये गल्लोगल्ली फिरून जागेवर धार काढून गाढविणीचे दूध विकणारी एक महिला आणि एक पुरुष दिसत आहेत. सोमवारी प्रकाशनगर येथे, दुधात महिला आढळली. काही नागरिकांनी जागेवर धार काढून गाढवणीचे दूध विकणारी एक महिला आणि पुरुष दिसत आहेत. सोमवारी प्रकाश नगर येथे मंगळवारी बसवंतपूर येथे दूध विकणारी महिला आढळली. काही नागरिकांनी जागेवर धार काढून अर्धा लिटर पर्यंत दूध खरेदी केले.

टॅग्स :दूधदुग्धव्यवसायदूध पुरवठाशेतकरीलातूरघरगुती उपाय