Lokmat Agro >शेतशिवार > Adulteration In Ghee : तुम्ही खरेदी करत असलेले तुप भेसळमुक्त आहे का? तुपातील भेसळ ठरते आहे आरोग्यासाठी हानीकारक

Adulteration In Ghee : तुम्ही खरेदी करत असलेले तुप भेसळमुक्त आहे का? तुपातील भेसळ ठरते आहे आरोग्यासाठी हानीकारक

Adulteration In Ghee : Is the ghee you are buying adulterated free? Adulteration in ghee is harmful to health | Adulteration In Ghee : तुम्ही खरेदी करत असलेले तुप भेसळमुक्त आहे का? तुपातील भेसळ ठरते आहे आरोग्यासाठी हानीकारक

Adulteration In Ghee : तुम्ही खरेदी करत असलेले तुप भेसळमुक्त आहे का? तुपातील भेसळ ठरते आहे आरोग्यासाठी हानीकारक

सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे तुपाची मागणी वाढली आहे. परंतु तुपातील भेसळ हे तुमच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरु शकते.

सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे तुपाची मागणी वाढली आहे. परंतु तुपातील भेसळ हे तुमच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरु शकते.

शेअर :

Join us
Join usNext

सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे सर्वत्र शुद्ध तुपाची मागणी वाढली आहे. परंतु तुपातील भेसळ हे तुमच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरु शकते.

त्यामुळे तुप घेताना ते भेसळ तर नाही ना? याची खात्री करणे आवश्यक आहे. अनेकजण बाहेरुन तुपाची खरेदी करतात.

त्यामुळे त्यांना तुप शुद्ध आहे की भेसळयुद्ध हे कळत नाही. यामुळे शक्यतो विश्वसनीय ठिकाणावरूनच तुप खरेदी करणे आरोग्यदायी आहे. 

भेसळयुद्ध तुप विक्री केल्यास होईल कारवाई

भेसळयुद्ध तुप विक्री केल्यानंतर त्याच्यावर अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे तुप विक्रेत्यांकडून तुप घेताना ते भेसळयुद्ध आहे का? याची माहिती घेणे आवश्यक आहे.

■ तूप काय भाव?

गायीचे १००० रुपये किलो : गाईच्या तुपाची विक्री करणारे कमी असल्यामुळे त्याचे भाव अधिक आहेत. सध्या गाईचे तुप १००० रुपयांनी विक्री होत आहे.

म्हशीचे ८०० रुपये किलो : नांदेड शहरात तुपाची मागणी वाढली असून म्हशीचे तुप सध्या ८०० रुपये किलो विक्री होत आहे.

■ तुपामुळे बिघडू शकते आरोग्य

अपचनाचा त्रास

भेसळयुक्त्त तुप खाल्यामुळे अपचनाचा त्रास होऊ शकतो. कारण त्यात पचनास हानीकारक घटक असतात.

कफ, खोकला, सर्दी

वातावरणात बदल होण्याच्या काळात भेसळयुक्त तुप खाल्यामुळे कफ किंवा खोकला, सर्दीचा त्रास होतो.

घशात खवखव

भेसळयुक्त तुपाच्या सेवनामुळे घशात खवखव होऊ शकते. त्यामुळे आवाज बसतो.

■ तुपाचे फायदे

तुपात आरोग्यासाठी उपयुक्त गुणधर्म असल्यामुळे तुप खाणे गरजेचे आहे. अनेकजण दिवसातून एक ते दोन चमचे तुप आहारात आवश्यक घेतात. तुप पचनशक्त्ती, त्वचा, केस तसेच हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. तसेच हाडांसाठी सुद्धा तुपाचा फायदा होतो.

तुप प्रकृतीने उष्ण असल्याने साधारणपणे थंडीच्या दिवसात तुप खाण्याचा सल्ला दिल्या जातो. हिवाळ्यात तुपाची मागणी असते.

हेही वाचा - Bajra Biscuits : आरोग्यदायी आणि स्वादिष्ट बाजरीचे मूल्यवर्धित बिस्किट्स

Web Title: Adulteration In Ghee : Is the ghee you are buying adulterated free? Adulteration in ghee is harmful to health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.