Lokmat Agro >शेतशिवार > नॅनो युरियानंतर आता नॅनो डीएपीची एन्ट्री, बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा 

नॅनो युरियानंतर आता नॅनो डीएपीची एन्ट्री, बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा 

After Nano Urea, now Nano DAP is a big announcement for farmers in the entry budget | नॅनो युरियानंतर आता नॅनो डीएपीची एन्ट्री, बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा 

नॅनो युरियानंतर आता नॅनो डीएपीची एन्ट्री, बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा 

Budget 2024:  शेतकऱ्यांसाठी आता एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. नॅनो युरीयानंतर आता नॅनो डिएपीची अंमलबजावणी होणार असल्याची घोषणा ...

Budget 2024:  शेतकऱ्यांसाठी आता एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. नॅनो युरीयानंतर आता नॅनो डिएपीची अंमलबजावणी होणार असल्याची घोषणा ...

शेअर :

Join us
Join usNext

Budget 2024:  शेतकऱ्यांसाठी आता एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. नॅनो युरीयानंतर आता नॅनो डिएपीची अंमलबजावणी होणार असल्याची घोषणा अर्थमंत्री  निर्मला सितारमन यांनी बजेटदरम्यान केली.यंदाचा म्हणजेच 2024 अर्थसंकल्प नुकताच संसदेत सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पामध्येअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांसाठी ही घोषणा केली.

शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने आता नॅनो डिएपी सर्व प्रकारच्या कृषी हवामान क्षेत्रात राबवले जाणार असल्याचे निर्मला सितारमन यांनी सांगितले.  शेतकऱ्यांची उत्पादन वाढ व्हावी यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात विशेष भर देण्यात आला आहे.

पिक उत्पादन खर्च कमी करायचाय? नॅनो युरिया व नॅनो डीएपी वापरा

काय आहे नॅनो डिएपी?

नॅनो डीएपी हे एक द्रवरूप खत आहे. भारत सरकारने २ मार्च २०२३ रोजी FCO अंतर्गत या खताची अधिसूचना काढली होती. ही खतं द्रवरूप असल्याने वनस्पतीच्या छिद्रातून किंवा पानांच्या रंध्रातून खत दिलं जातं. ज्यामुळे बियाणं किंवा ते रोप अधीक जोमाने वाढते. 

गुणवत्ता आणि कार्यक्षमता चांगली असल्यानं पिकांच्या पोषणाची गरज भागली जाते. पिकाच्या वाढीच्या गंभीर अवस्थेत गरजेनुसार नॅनो डिएपीच्या फवारण्या केल्याने पिकाची गुणवत्ता आणि पीक उत्पादन वाढण्यास मदत मिळते.

Web Title: After Nano Urea, now Nano DAP is a big announcement for farmers in the entry budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.