खजूर हे एक स्वादिष्ट आणि अत्यंत पौष्टिक फळ आहे. खजूराचा वापर प्राचीन काळापासून केला जात आहे. याचे पोषण मूल्य तसेच आरोग्य फायदे आजही अनन्यसाधारण आहेत. खजूर मुख्यतः मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेत पिकणारे फळ असले तरी आता ते जगभरात उपलब्ध आहे.
खजूराचे पोषण मूल्य : खजूर फळात असंख्य पोषक तत्वे असतात. ज्यात १०० ग्रॅम खजूर फळाचे पोषण मूल्य पुढीलप्रमाणे आहे.
• ऊर्जा : २७७ कॅलरी
• कार्बोहायड्रेट्स : ७५ ग्रॅम
• फायबर : ७ ग्रॅम
• प्रथिने : २ ग्रॅम
• फॅट : ०.१५ ग्रॅम
• कॅल्शियम : ६४ मि.ग्रॅ.
• लोह : ०.९० मि.ग्रॅ.
• मॅग्नेशियम : ५४ मि.ग्रॅ.
• पोटॅशियम : ६९६ मि.ग्रॅ.
• विटामिन बी६ : ०.२४ मि.ग्रॅ.
खजूराचे आरोग्य फायदे : खजूर फळाच्या नियमित सेवनाने अनेक आरोग्य फायदे होतात. त्यातील काही महत्त्वाचे फायदे पुढीलप्रमाणे आहे.
• ऊर्जादायी फळ : खजूर फळातील उच्च कार्बोहायड्रेट्स आणि साखर त्वरित ऊर्जा देतात, ज्यामुळे खेळाडू आणि शारीरिक श्रम करणाऱ्या लोकांसाठी हे फळ उत्तम आहे.
• पचनासाठी फायदेशीर : खजूरातील उच्च फायबरमुळे पचनक्रिया सुधारते. यामुळे बद्धकोष्ठता आणि पचनसंस्थेच्या समस्यांवर उपाय होतो.
• हृदयाच्या आरोग्यासाठी : खजूरातील पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हे घटक रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात आणि हृदयविकाराचा धोका कमी करतात.
• हाडांच्या आरोग्यासाठी : खजूरात असलेल्या कॅल्शियम, फॉस्फरस, आणि मॅग्नेशियममुळे हाडांची घनता सुधारते आणि हाडांच्या आजारांचा धोका कमी होतो.
• रक्तक्षयावर उपाय : खजूरातील लोह रक्तक्षय (अॅनिमिया) या आजारावर उपाय म्हणून उपयोगी आहे. नियमित खजूराचे सेवन केल्याने रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते.
• मज्जासंस्थेसाठी लाभदायी : खजूरातील विटामिन बी६ आणि मॅग्नेशियम मज्जासंस्थेचे कार्य सुधारतात आणि मानसिक आरोग्य चांगले राहते.
• अँटिऑक्सिडंट गुणधर्म : खजूरातील विविध अँटिऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्सशी लढतात आणि विविध आजारांपासून संरक्षण करतात.
• त्वचेच्या आरोग्यासाठी : खजूरात असलेल्या व्हिटॅमिन सी आणि डी मुळे त्वचेचे आरोग्य सुधारते. हे घटक त्वचेच्या चमकदारपणासाठी आणि ताजेतवानेपणासाठी उपयुक्त आहेत.
• डायबिटीज नियंत्रण : खजूरातील नैसर्गिक साखर, फायबर, आणि प्रथिने यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते. खजूराचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी सुरक्षित आहे, परंतु प्रमाणातच सेवन करणे आवश्यक आहे.
• वजन कमी करण्यासाठी : खजूरातील उच्च फायबरमुळे तृप्तता वाढते आणि खाण्याची इच्छा कमी होते. यामुळे वजन कमी करण्यासाठी खजूराचे सेवन फायदेशीर ठरते.
खजूराचे विविध प्रकार : खजूर फळाचे विविध प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. त्यातील काही लोकप्रिय प्रकार पुढीलप्रमाणे आहे.
• मेडजूल खजूर : हे खजूर मोठे, गोड आणि मऊ असतात. हे खजूर सर्वोत्तम गुणवत्तेचे मानले जातात.
• दागलेट नूर खजूर : हे खजूर मध्यम आकाराचे आणि स्वादिष्ट असतात. हे खजूर अनेक पाककृतींमध्ये वापरले जातात.
• बरही खजूर : हे खजूर गोलाकार आणि कुरकुरीत असतात. हे खजूर ताजेतवाने खाण्यासाठी उपयुक्त आहेत.
• खद्रावी खजूर : हे खजूर आकाराने छोटे आणि गोड असतात. हे खजूर साधारणपणे उन्हाळ्यात उपलब्ध असतात.
खजूराचे खाद्य पदार्थांमधील उपयोग : खजूराचे सेवन विविध पदार्थांमध्ये मिसळून करता येते. तसेच खजूराचे काही लोकप्रिय उपयोग देखील आहेत यातील काही उपयोग पुढीलप्रमाणे आहेत.
• स्मूदी: खजूराचे तुकडे करून स्मूदीमध्ये मिसळा.
• सलाड: खजूराचे तुकडे सलाडमध्ये घाला.
• स्नॅक्स: खजूराचे तुकडे करून शेंगदाणे, बदाम आणि अन्य ड्रायफ्रूट्ससोबत खा.
• पाककृती: खजूराचे पेस्ट बनवून मिठाई, केक, ब्रेड आणि अन्य पदार्थांमध्ये वापरा.
खजूर हे अत्यंत पौष्टिक आणि आरोग्यवर्धक फळ आहे. याचे नियमित सेवन केल्याने विविध आरोग्य फायदे मिळतात. त्यामुळे आपल्या आहारात खजूराचा समावेश करून आपण आपल्या आरोग्याची काळजी घेऊ
लेखिका
डॉ. सोनल रा. झंवर
सहाय्यक प्राध्यापक एम. जी. एम अन्नतंत्र महाविद्यालय गांधेली छत्रपती संभाजीनगर.