पुणे : कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या लोकांचा सन्मान कृषी विभागाकडून दरवर्षी केला जातो. यामध्ये कृषी क्षेत्रातील फलोत्पादन आणि कृषी उत्पादन, उत्पन्न वाढीकरता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांना (Farmers), व्यक्तींना, संस्थांना, गटांना प्राधान्य दिले जाते. या पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहान कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. (Agriculture Awards Latest Updates)
दरम्यान, कृषी विभागाकडून डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, सेंद्रीय शेती कृषिभूषण पुरस्कार, उद्यानपंडीत पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार व कृषि विभागामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी/ कर्मचारी यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात येते.
तर वरील सर्व प्रकारातील पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात येत असून जास्तीत जास्त शेतकरी / गट / संस्था/व्यक्ती यांनी विविध कृषी पुरस्कार प्रस्ताव आपल्या नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून (Agriculture Department) करण्यात येत आहे.