Join us

Agri Stack : गावांत आता 'ॲग्रिस्टॅक' योजनेची उद्यापासून अंमलबजावणी; कसा मिळेल लाभ ते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 11:41 IST

केंद्र शासनाने 'ॲग्रिस्टॅक' योजनेच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या असून ॲग्रिस्टॅक हे कृषी क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवा वापरून शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने पोहोचण्यासाठी काम केले जाणार आहे. वाचा सविस्तर (Agri Stack)

Agri Stack : केंद्र शासनाने 'ॲग्रिस्टॅक' योजनेच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या असून ॲग्रिस्टॅक हे कृषी क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवा वापरून शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने पोहोचण्यासाठी उद्यापासून राज्यात कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी संचालक रफिक नाईकवाडी यांनी केले आहे. 

केंद्र शासनाने 'ॲग्रिस्टॅक' योजनेच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या असून ॲग्रिस्टॅक हे कृषी क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवा वापरून शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने पोहोचण्यासाठी स्थापित केले जाणारे फाउंडेशन आहे.

पथदर्शी कार्यक्रमातील आशादायक व दूरगामी परिणाम करणाऱ्या या योजनेची अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्रात कालबद्ध पद्धतीने करण्याचे महाराष्ट्र शासनाने निश्चित केले आहे. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी कृषी व संलग्न विभागांना शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेताचा आधार संलग्न माहिती संच तयार करण्यात येत आहे. त्यामुळे उपलब्ध आकडेवारीच्या आधारे शेतकरी बांधवांना विविध योजनांचा लाभ वितरित करण्यासाठी सुलभता येईल आणि लाभार्थ्यांना वारंवार प्रमाणीकरणाची आवश्यकता राहणार नाही. ही योजना महसूल विभाग, कृषी विभाग आणि ग्रामविकास विभाग यांच्या वतीने संयुक्तपणे राबविण्यात येत आहे.

राज्यातील गावांसाठी १६ डिसेंबरपासून मोहीम राबविण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर वाशिम तालुक्यातील शेलापूर खुर्द या गावात आज १४ डिसेंबर रोजी या योजनेच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली.

सर्व शेतकरी बांधवांनी त्यांच्या गावात आयोजित करण्यात येणाऱ्या शिबिरात जास्तीत जास्त  संख्येने उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून द्यावित आणि ॲग्रिस्टॅक योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मोताळा तहसीलदार आणि तालुका समितीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांनी केले आहे.

दरम्यान, ॲग्रिस्टॅक योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना डिजीटल ओळख मिळणार आहे. विविध योजनेच्या लाभासाठी कार्ड उपयुक्त ठरणार आहे.  

कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे, याकरिता केंद्र शासनाची ॲग्रिस्टॅक योजना राज्यात राबविण्यात मान्यता देण्यात आलेली आहे.

त्यानुषंगाने वाशिम तालुक्यातील १२३ गावांत योजना राबविली जाणार असून, प्रायोगिक तत्त्वावर एका गावांतून १४ डिसेंबर रोजी योजनेचा प्रारंभ करण्यात आला आहे.

दोन दिवसांत राज्यात कॅम्प लागणार आहेत आणि शेतकऱ्यांची माहिती जमा करण्याचे काम केले जाणार आहे. महसूल विभाग आणि कृषी विभागाकडून हे काम केले जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची सर्व माहिती एकाच प्लॅटफॉर्मवर येणार आहे आणि शेतकऱ्यांना नव्या योजनांचा लाभ घेण्यासाठी फायदा होणार आहे. - रफिक नाईकवाडी, संचालक, कृषी आयुक्तालय

'ॲग्रिस्टॅक योजने'च्या माध्यमातून विविध योजनेचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणे सोयीचे होणार असून वेळेत मदत मिळेल. या योजनेची अंमलबजावणी १६ डिसेंबरपासून होणार असून गावोगावी शिबिर घेतले जाणार आहेत. यामध्ये शेतकऱ्यांनी सहभागी होऊन नोंदणी करावी. - हेमंत पाटील, तहसीलदार, वाशिम

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीसरकारी योजनासरकारकेंद्र सरकार