Lokmat Agro >शेतशिवार > पदवीधरांसाठी सुरु होतोय कृषी ड्राेन अभ्यासक्रम, कुठे व कधी होणार सुरुवात?

पदवीधरांसाठी सुरु होतोय कृषी ड्राेन अभ्यासक्रम, कुठे व कधी होणार सुरुवात?

Agricultural Drainage Course for Graduates, Opportunity to Learn Technology with Research, Where and When to Start? | पदवीधरांसाठी सुरु होतोय कृषी ड्राेन अभ्यासक्रम, कुठे व कधी होणार सुरुवात?

पदवीधरांसाठी सुरु होतोय कृषी ड्राेन अभ्यासक्रम, कुठे व कधी होणार सुरुवात?

सहा महिन्यांच्या या अभ्यासक्रमाअंतर्गत सेन्सर प्रणालीतून पीक नियंत्रण, कृषी व्यवसायिकता शिकण्याची संधी..

सहा महिन्यांच्या या अभ्यासक्रमाअंतर्गत सेन्सर प्रणालीतून पीक नियंत्रण, कृषी व्यवसायिकता शिकण्याची संधी..

शेअर :

Join us
Join usNext

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील नॅशनल अॅग्रीकल्चर हायर एज्युकेशन प्रोजेक्ट (नाहेप) केंद्राद्वार सहा महिन्यांचा कृषी ड्रोन तंत्रज्ञानावरील व्यावसायिक व संशोधन प्रमाणपत्र अभ्यासक्रम १८ मेपासून सुरू होत आहे.

या अभ्यासक्रमाकरिता रिमोट पायलट लायसन्सधारक अथवा अभियांत्रिकी शाखेतील पदवीधर उमेदवार पात्र आहेत. अभ्यासक्रमात ड्रोन तंत्रज्ञानावरील मूलभूत अभ्यासक्रम व कृषी उपयुक्तता ज्यामध्ये पीक निरीक्षण सेन्सर प्रणालीतून ड्रोनद्वारा विविध कार्य, पीक रोग तपासणी, फवारणीसारखी विविध कार्य करण्याकरिता संरचना व निर्मितीसारख्या नवीन ड्रोन तंत्रज्ञान शिकण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

या अभ्यासक्रमानंतर विविध कृषी ड्रोन उत्पादक कंपनी, शासकीय कार्यालय, सुरक्षा मंत्रालय यांसारख्या क्षेत्रात नोकरी वा स्वतःचा व्यवसाय असा फायदा होऊ शकतो. मागील ४ वर्षांपासून नाहेप केंद्राने कृषी ड्रोन क्षेत्रात मोठे कार्य केलेले असून, संशोधन विद्यार्थ्यांना तंतोतंत कृषी व्यवसायकता साधण्यासाठी संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. विविध १२ देशांत ५५ संशोधन विद्यार्थ्यांना तसेच, २५ प्राध्यापकांना १ ते ३ महिने प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले होते.

कुलगुरू डॉ. इन्द्र मणि हे स्वतः या अभ्यासक्रमात एक विषय शिकविणार असून, अभ्यासक्रमातील कृषीविषयक ड्रोन तंत्रज्ञान अभ्यासक्रम तयार करताना त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके आणि नियंत्रक प्रवीण निर्मळ यांची प्रमुख उपस्थिती होती. या अभ्यासक्रमाची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध असून, अभ्यासक्रमाकरिता इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज गुगल फॉर्मद्वारे संकेत स्थळावर नोंदीत करावा.

Web Title: Agricultural Drainage Course for Graduates, Opportunity to Learn Technology with Research, Where and When to Start?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.