विदर्भातील शेतकऱ्यांसाठी आजपासून ७ तारखेपर्यंत कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. तसेच बांबू लागवडीसह आर्थिक उत्त्पन्नाच्या संधीविषयी या प्रदर्शनात चर्चा केली जाणार आहे.
राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट अत्याधुनिक तंत्रज्ञान सादरीकरणाची दालने, कृषिविषयक ताज्या विषयांवरील कार्यशाळा, विदर्भाच्या शेती उद्योगाला नवी दिशा देणाऱ्या परिषदांसह तंत्रज्ञान संशोधनासाठी तसेच एमएसएमई व पशुधन ही विशेष दालने या प्रदर्शनाची वैशिष्ट्ये आहेत.
आयोजन कुठे?
३ ते ७ जानेवारी २०२४ रोजी आत्मा व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने चांदा क्लब मैदान चंद्रपूर येथे भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
व्याख्याने कोणती?
यात कृषी विकास, ग्राम विकास, पशु संवर्धन, शेतकरी उत्पादक कंपनी या विविध विषयावर सखोल अभ्यास असणाऱ्या व्यक्तिची व्याख्याने, मीलेट मिशन विषयी विशेष माहिती सत्र, तसेच गो पालन व्यवसाय, बांबू लागवड, आर्थिक उत्पन्नाच्या संधी, स्वच्छ कापूस उत्पादन, खरेदी व विक्रेता यांच्याशी मूल्यसाखळी संदर्भात परिसंवाद व चर्चांचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.