Agricultural Research Center : स्थानिक कृषी संशोधन केंद्राला शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याकरीता सभागृह उपलब्ध झाले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संचालित सदर संशोधन केंद्राला परतवाडा ते अंजनगाव मार्गावर टुमदार इमारत उभारण्यात आली आहे.
या इमारतीचे बांधकाम आणि रंगरंगोटीचे काम पूर्णत्वास गेले आहे. त्यामुळे या इमारतीचे लोकार्पण झाल्यानंतर सदर नवीनतम इमारत शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणाकरिता वापरली जाणार आहे.
परतवाडा येथील विविध संकटांत सापडलेल्या शेतकऱ्यांना पीकपेरा व पिकांवरील विविध रोगांच्या आक्रमणापासून शेतीचे नुकसान वाचावे, शासनाच्या योजनांची माहिती मिळावी, संकटात सापडलेल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी येथील कृषी संशोधन केंद्रात माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या अथक परिश्रमातून शेतकरी प्रशिक्षण सभागृह उभारण्यात आले आहे.
आता संत्रा उत्पादक तथा इतर शेतकऱ्यांना योग्य प्रशिक्षण मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. स्थानिक कृषी संशोधन केंद्राला शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याकरिता सभागृह तयार करण्यात आले आहे. डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (अकोला) संचालित संशोधन केंद्र परतवाडा ते अंजनगाव मार्गावर उभारण्यात आले आहे.
माजी आमदार बच्चू कडू यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू व्ही. एम. भाले यांच्या प्रमुख उपस्थितीत २०२१ मध्ये इमारतीची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. सदर इमारत आत्ता पूर्ण झाली असून इमारतीच्या पुढील भागाचे काँक्रीटीकरण केले जात आहे. या परिसरात अनेक वर्षानंतर शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी हक्काची इमारत उभी राहिली आहे.
अचलपूर आणि चांदुर बाजार या दोन्ही तालुक्यात हजारो हेक्टर क्षेत्रावर असलेल्या संत्राबगा मागील ५ वर्षापासून संकटात आहे. हा संत्रा पट्टा भकास होण्याच्या मार्गावर आहे. बदलत्या तापमानाचा परिणाम विविध पिकांवर तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होत आहे. त्यामुळे या संशोधन केंद्रातून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळेल.
पिकांच्या वाणावर संशोधन
संशोधन केंद्रामध्ये कृषीबाबत संशोधन आणि मार्गदर्शन केले जाते. लिंबूवर्गीय फळे, तेलबिया, भाजीपाला, केळी, धान्य आदी पिकांच्या विविध वाणांवर संशोधन केले जाते. सर्व कसोट्यांवर पात्र वाणांच्या प्रमाणीकरणासाठी पुढील सोपस्कार केले जातात. संशोधनकार्याकरिता शेकडो एकर जमीन केंद्राच्या मालकीची आहे. येथे शेतकरी प्रशिक्षण केंद्र उभारावे, यासाठी माजी आमदार बच्चू कडू यांनी पुढाकार घेतला होता, हे विशेष.
अचलपूर, चांदूर बाजार तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील संत्राबागा संकटात आहेत. हा संत्रा पट्टा भकास होण्याच्या मार्गावर आहे. बदलत्या तापमानाचा परिणाम विविध पिकांवर आणि उत्पन्नावर होत आहे. त्यामुळे या संशोधन केंद्रातून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे भरघोस आणि दर्जेदार उत्पन्न मिळेल. - बच्चू कडू, माजी आमदार, अचलपूर