Join us

कृषी सेवा केंद्रांचा तीन दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2023 9:39 AM

२,३ व ४ तारखेपर्यंत तीन दिवस सर्व दुकाने बंद राहतील अशी माहिती पुणे जिल्हा ॲग्रो डीलरचे अध्यक्ष महेश मोरे यांनी दिली.

शासनाच्या कृषी हिताला बाधा आणणाऱ्या जाचक नियमांना विरोध करण्यासाठी तसेच प्रस्तावित कायदे रद्द करण्यासाठी ऐन रब्बी हंगामात महाराष्ट्रातील कृषी सेवा केंद्रांचा ३ दिवसीय राज्यस्तरीय बंदचा निर्णय झाला आहे. २,३ व ४ तारखेपर्यंत तीन दिवस सर्व दुकाने बंद राहतील अशी माहिती पुणे जिल्हा ॲग्रो डीलरचे अध्यक्ष महेश मोरे यांनी दिली.

महाराष्ट्र शासनाच्या नवीन प्रस्तावित कृषी कायदा विधेयकमधील कृषी हिताला बाधा आणणाऱ्या जाचक नियमांना विरोध करण्यासाठी व प्रस्तावित कायदे रद्द करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व कृषी सेवा केंद्र ऐन रब्बी हंगामात येत्या गुरुवारी दि २ ते शनिवारी ४ नोव्हेंबर असा ३ दिवसांचा बंद पाळून राज्य शासनाच्या या कायद्याचा निषेध नोंदवणार आहे.

या संदर्भात महाराष्ट्र फर्टिलायझर्स डीलर्स असोशिएशन (माफदा) यांनी वेळोवेळी कृषी सचिव, कृषी आयुक्त तसेच कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनाही निवेदन देऊन तसेच बैठक घेऊन सदर अन्यायकारक कायद्यातील जाचक नियमांमुळे होणारे संभाव्य नुकसान व धोके व संपूर्ण व्यापारावर होणारे विपरीत परिणाम व त्यातूनच एकंदरीत शेतकरी बांधवांचे होणारे नुकसान याविषयी माहिती दिली गेली.

यावर समाधानकारक तोडगा न निघाल्यामुळे सदर ३ दिवसांच्या बंदचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती असोशिएशनचे सचिव विपीन कासलीवाल व अध्यक्ष विनोद तराळ पाटील यांनी दिली. जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्र येत्या २,३ व ४ तारखेपर्यंत बंद राहतील याची शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी असे आवाहन पुणे जिल्हा अॅग्रो डिलर्सचे अध्यक्ष महेश मोरे यांनी केले आहे.

टॅग्स :शेतकरीखतेधनंजय मुंडेराज्य सरकारसरकार