राज्यात मराठवाड्यात काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला असला तरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुढील पाच दिवस स्वच्छ व अंशत: ढगाळ वातावरण राहणार असल्याचे प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवले.
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात कमाल तापमान ३९.० ते ४२.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २६.० ते २८.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील. सापेक्ष आर्द्रता २३ ते ६६ टक्के राहणर असून वाऱ्याचा वेग २१ ते २४ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान जिल्ह्यातील शेतकरी पेरणीपूर्व मशागतीत गुंतला आहे. बियाणे, खतांची जमवाजमव करण्यात येत असून शेतकऱ्यांना मान्सूनची प्रतीक्षा आहे. दरम्यान, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामान केंद्राने शेतकऱ्यांसाठी पेरणीपूर्व नियोजनाची अशी शिफारस केली आहे.
ऊसाला गरजेनुसार द्या पाण्याच्या पाण्या
मागील आठवड्यातील ढगाळ वातावरण व तापमानातील चढउतारामुळे ऊस पिकामध्ये खोडकिडा दिसून येतआहे. याच्या नियंत्रणासाठी क्लोरॅन्ट्रनिलीप्रोल १८.५ टक्के एस.सी. ३ - ४ मिली प्रति १० लीटर पाण्यात मिसळून सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेत फवारणी करावी. तसेच ऊस पिकास योग्य वेळेच्या अंतराने गरजेनुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
कापूस वाणांची निवड कशी कराल?
कापूस बियाणांवरून शेतकरी आक्रमक झालेला असताना जमीन,कोरडवाहू किंवा बागायती,लागवडीचा प्रकार व वाणांचे गुणधर्म यानुसार कापूस पिकाच्या लागवडीकरता वाणांची निवड करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मक्यसाठी या सुधारित वाणांचा करा निवड
मका पिकाच्या लागवडीसाठी नवज्योत, मांजरा,डीएमएच-१०७, केएच-९४५१, एमएचएच, प्रभात, करवीर,डेक्कन-१०३ पिनॅकल इत्यादी या सारख्या सुधारित वाणांची निवड करावी.
तूर पेरणीसाठी..
तूर पिकाच्या पेरणीसाठी बीडीएन-७११,बीडीएन २०१३-४१(गोदावरी), बीडीएन-७०८, बीएसएमआर-८५३, बीएसएमआर-७३६, बीडीएन-७१६ या सारख्या सुधारित वाणांची निवड करावी.
मूग/उडीद
मूग लागवडीसाठी बीएम -४, कोपरगांव, बीपीएमआर-१४५, बीएम-२००२-१, बीएम-२००३-२, फुलेमुग-२, पीकेव्हीकेएम-४ या वाणांची तर उडीद लागवडीसाठी बिडीयु -१, टीएयु -१, टीपीयु -४ या वाणांची निवड करावी.
सिताफळ
सिताफळाच्या नवीन लागवडीसाठी ४५ x ४५ x ४५ सेमी आकाराचे खड्डे घेऊन त्यात दिड ते दोन घमेले शेणखत किंवा चांगले कुजलेले कंपोस्ट खत अर्धा किलो सुपर फॉस्फेट व फोलिडोल पावडर व चांगल्या मातीच्या मिश्रणाने ते खडे भरावे.
आंबा
नवीन आंबा रोपे लागवडीसाठी १ x १ x १ आकाराचे खड्डे घेऊन त्यात अर्धा किलो सुपर फॉस्फेट ५० किलो शेणखत किंवा कंपोस्ट खत व पोयटा माती या सर्व मिश्रणाने खड्डे भरून घ्यावेत.
भाजीपाला-रोपे तयार करणे
खरीप हंगातात भाजीपाला लागवडीसाठी रोपवाटीकेत गादी वाफयावर बियाण्याची लागवड करून रोपे तयार करावीत.तसेच काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी सकाळी व सायंकाळच्या वेळेस करावी.