Join us

Agriculture Awards : जवळपास ४०० उत्कृष्ट शेतकऱ्यांना मिळणार पुरस्कार; कृषी विभागाकडून मुंबईत आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 8:26 PM

Agriculture Awards : २०२० ते २०२२ या तीन वर्षांतील शेतकऱ्यांना मिळालेले विविध पुरस्कार आणि २०२३-२४ मधील पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांना २९ सप्टेंबर रोजी मुंबई येथे पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. 

Agriculture Award : राज्यातील शेती क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या आणि विक्रमी पिकाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकाच्या कृषी विभागाकडून पुरस्कार देण्यात येतात. तर २०२० ते २०२२ या तीन वर्षांतील शेतकऱ्यांना मिळालेले विविध पुरस्कार आणि २०२३-२४ मधील पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांना २९ सप्टेंबर रोजी मुंबई येथे पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. या तीन वर्षातील साधारण ३०० तर पीकस्पर्धेतील साधारण १०० असे मिळून साधारण ४०० शेतकऱ्यांचा सन्मान केला जाणार आहे.

कोणते पुरस्कार?राज्यात कृषि, कृषि संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती/संस्था यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार, उद्यानपंडीत पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट/आदिवासी गट), पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार (आयुक्तालय/मंत्रालय स्तर) असे विविध पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात येते. 

किती शेतकऱ्यांना मिळणार पुरस्कार? २०२० सालचे पुरस्कारपुरस्काराचे नाव - शेतकऱ्यांची संख्या१) डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार २०२० - बाळासाहेब मराळे, नाशिक२) वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार २०२० - ८ विभागातील ९ शेतकऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.३) जिजामाता कृषिभूषण पुरस्कार २०२० - ७ विभागातील ७ शेतकऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.४) कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार २०२० - ६ विभागातील ६ शेतकऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.५) वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार २०२० - ७ विभागातील ८ शेतकऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे६) युवा शेतकरी पुरस्कार - ८ विभागातील ८ शेतकऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.७) उद्यानपंडीत पुरस्कार -  ८ विभागातील ८ शेतकऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.८) वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट) - ८ विभागातील ३२ शेतकऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.९) वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (आदिवासी गट) - ४ विभागातील ४ शेतकऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.१०) पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार (आयुक्तालय/मंत्रालय स्तर) - ९ अधिकाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

२०२१ सालचे पुरस्कारपुरस्काराचे नाव - शेतकऱ्यांची संख्या१) डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार - ३ शेतकऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.२) वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार - ८ विभागातील ९ शेतकऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.३) जिजामाता कृषिभूषण पुरस्कार - ८ विभागातील १० शेतकऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.४) कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार - ८ विभागातील ८ शेतकऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.५) वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार - ७ विभागातील ८ शेतकऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे६) युवा शेतकरी पुरस्कार - ८ विभागातील ८ शेतकऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.७) उद्यानपंडीत पुरस्कार - ७ विभागातील ८ शेतकऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.८) वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट) - ८ विभागातील ३३ शेतकऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.९) वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (आदिवासी गट) - ६ विभागातील ७ शेतकऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.१०) पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार (आयुक्तालय स्तर) - ९ अधिकाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.११) पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार (मंत्रालय स्तर) - उ. ना. चांदिवडे, अवर सचिव, कृषी व पदुम विभाग

२०२२ सालचे पुरस्कारपुरस्काराचे नाव - शेतकऱ्यांची संख्या१) डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार - अनिल नारायण पाटील, पालघर२) वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार - ७ विभागातील ९ शेतकऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.३) जिजामाता कृषिभूषण पुरस्कार - ८ विभागातील ९ शेतकऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.४) कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार - ६ विभागातील ७ शेतकऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.५) वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार - ८ विभागातील ९ शेतकऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे६) युवा शेतकरी पुरस्कार - ८ विभागातील ९ शेतकऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.७) उद्यानपंडीत पुरस्कार - ८ विभागातील ९ शेतकऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.८) वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट) - ८ विभागातील ३२ शेतकऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.९) वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (आदिवासी गट) - ६ विभागातील ६ शेतकऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.१०) पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार (आयुक्तालय स्तर) - ७ अधिकाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.११) पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार (मंत्रालय स्तर) - अभिजित चव्हाण, सहाय्यक कक्ष अधिकारी, कृषी व पदुम विभाग.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीमहाराष्ट्र