Lokmat Agro >शेतशिवार > Agriculture based industries: अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर; शेती आधारित उद्योगाला मिळणार बुस्टरडोस वाचा सविस्तर

Agriculture based industries: अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर; शेती आधारित उद्योगाला मिळणार बुस्टरडोस वाचा सविस्तर

Agriculture based industries: Good news for farmers in Akola district; Agriculture based industries will get booster doses Read in detail | Agriculture based industries: अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर; शेती आधारित उद्योगाला मिळणार बुस्टरडोस वाचा सविस्तर

Agriculture based industries: अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर; शेती आधारित उद्योगाला मिळणार बुस्टरडोस वाचा सविस्तर

Agriculture based industries : अकोला जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद ७ एप्रिल रोजी पार पडली असून, विविध ९५ उद्योग-व्यवसायांसोबत जिल्ह्यात शेती आधारित उद्योगांवर ६५८ कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. (agriculture-based industries)

Agriculture based industries : अकोला जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद ७ एप्रिल रोजी पार पडली असून, विविध ९५ उद्योग-व्यवसायांसोबत जिल्ह्यात शेती आधारित उद्योगांवर ६५८ कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. (agriculture-based industries)

शेअर :

Join us
Join usNext

Agriculture based industries : अकोला जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद ७ एप्रिल रोजी पार पडली असून, विविध ९५ उद्योग-व्यवसायांसोबत जिल्ह्यात १ हजार २३८ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार करण्यात आले.(agriculture-based industries)

त्यापैकी ६५८ कोटी रुपयांची गुंतवणूक शेती आधारित उद्योगांवर अपेक्षित असल्याने, जिल्ह्यातील ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणाला चालना मिळणार आहे.(agriculture-based industries)

यंदाच्या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत १ हजार २३८ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील रोजगार निर्मितीमध्ये वाढ होणार आहे.

यासोबतच एकूण गुंतवणुकीच्या सामंजस्य करारांपैकी ६५८ कोटी रुपयांची गुंतवणूक शेती आधारित डाळ मिल, कापूस जिनिंग व प्रेसिंग आदी प्रक्रिया उद्योगांमध्ये होण्याचे अपेक्षित आहे.(agriculture-based industries)

शेती आधारित उद्योगांसाठी गुंतवणुकीत वाढ होत असल्याने, जिल्ह्यातील ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होण्यास आणि शेतकऱ्यांच्या शेतमालास योग्य बाजारभाव मिळण्यास महत्त्वपूर्ण मदत होणार आहे.(agriculture-based industries)

प्रक्रिया उद्योग वाढणार!

शेती आधारित उद्योगांमध्ये गुंतवणूक वाढणार असल्याने, शेतीमालावर आधारित प्रक्रिया उद्योग तसेच फळ आणि अन्न प्रक्रिया उद्योगांचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील संत्रा, लिंबू आदी फळवर्गीय पिकांना योग्य भाव मिळणार असून, संबंधित फळपिकांचे क्षेत्र वाढविण्यास होईल.

यंदाच्या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत १ हजार २३८ कोटी रुपयांच्या एकूण सामंजस्य करारांपैकी ६५८ कोटी रुपयांची गुंतवणूक शेती आधारित उद्योगांमध्ये होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात शेतीमालास योग्य भाव मिळण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या भविष्यातील अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे. - अजित कुंभार, जिल्हाधिकारी, अकोला.

हे ही वाचा सविस्तर : Tango Santra: टँगो गोल्डमुळे संत्रा उत्पादकांना येतील सोनेरी दिवस कसे ते वाचा सविस्तर

Web Title: Agriculture based industries: Good news for farmers in Akola district; Agriculture based industries will get booster doses Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.