Join us

कृषि ड्रोनची बात न्यारी, नविन तंत्रज्ञान लई भारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 9:59 AM

कृषि विज्ञान केंद्र सगरोळी आणि रिलायन्स फाऊंडेशन च्या शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत अमृतालयम शेतकरी उत्पादक कंपनी च्या सोयाबीन सीड प्रक्षेत्रावर प्रत्यक्षात ड्रोन च्या साह्याने फवारणी करण्यात आली.

संस्कृति संवर्धन मंडळ सगरोळी संचलित कृषि विज्ञान केंद्र सगरोळी आणि रिलायन्स फाऊंडेशन यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती होत आहे. याचाच एक भाग म्हणुन दिनांक २१ सप्टेंबर २०२३ रोजी कृषि विज्ञान केंद्र सगरोळी आणि रिलायन्स फाऊंडेशन च्या शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत अमृतालयम शेतकरी उत्पादक कंपनी च्या सोयाबीन सीड प्रक्षेत्रावर प्रत्यक्षात ड्रोन च्या साह्याने फवारणी करण्यात आली त्या वेळी कृषि विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञ डॉ. प्रियंका खोले आणि रिलायन्स फाऊंडेशन चे वरिष्ट शास्त्रज्ञ नासेरजी अली त्याच सोबत पुणे येथून आलेले CS innovations ड्रोन कंपनी चे इंजिनिअर उपस्थित होते.

अमृतालयम शेतकरी उत्पादक कंपनी च्या सदस्य शेतकऱ्यांनी ड्रोन फवारणी नंतर शास्त्रज्ञ आणि इंजिनियर यांच्या सोबत सविस्तर चर्चा करून ड्रोन तंत्रज्ञानाबद्धल सविस्तर माहिती गोळा केली. या चर्चे दरम्यान ड्रोन तंत्रज्ञानाबद्धल शेतकऱ्यांच्या मनात असलेले समज गैरसमज दूर झाले आणि ड्रोन फवारणी बद्धल शेतकऱ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन दाखवला नवीन तंत्रज्ञानाबद्धल समाधान व्यक्त केले.

मागील दशकापासून कृषि विज्ञान केंद्र सगरोळी च्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती होताना दिसत आहे आणि नक्कीच या तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकरी समृध्द होतील हा एकवेम उद्देश कृषि विज्ञान केंद्र सगरोळी चा आहे. संस्कृति संवर्धन मंडळ सगरोळी कृषि विज्ञान केंद्राने ही संधी उपलब्ध करून दिल्या बद्धल अमृतालयम शेतकरी उत्पादक कंपनी च्या सदस्य शेतकऱ्यांकडून संस्थेचे मनःपूर्वक धन्यवाद आणि आभार मानले.

टॅग्स :पीकपीक व्यवस्थापनकृषी विज्ञान केंद्रशेतकरी