Join us

Agriculture Growth Rate : कृषी क्षेत्रात पहिल्या तिमाहीत कसे राहीले उत्पादन? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2024 12:21 PM

उष्णतेच्या लाटेमुळे पीक उत्पादनात घट झाल्यामुळे भारताची कृषी वाढ पहिल्या तिमाही घसरली. (Agriculture Growth Rate)

देशातील एकूण देशांतर्गत उत्पादन चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते जून या तिमाहीत ६.७ टक्क्यांनी खाली घसरण झाली. सरकारने खर्चात कपात आणि ग्राहक खर्च कमी केल्यामुळे जीडीपीतील वाढही घटली आहे. कृषी क्षेत्रात पहिल्या तिमाहीत काही पिकांच्या उत्पादनात घट झाल्याने ४.२ टक्क्यांवरून स्थिर किंमतींवर २.७ टक्क्यांवर घसरली. 

कोरड्या हवामानामुळे अनेक रब्बी पिकांचे उत्पादन, विशेषतः मका, तृणधान्ये आणि कडधान्ये यांचे उत्पादन २०२३ च्या तुलनेत कमी होते. २०२३ च्या मोसमातील नैऋत्य मान्सून ५.६ टक्के तुटीसह संपला. ज्याने त्याला "सामान्य पेक्षा कमी" मान्सून हंगाम म्हणून वर्गीकृत केले. 

सांख्यिकीयदृष्ट्या, १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण भारतात एकूण ८६९ मिलिमीटर पाऊस अपेक्षित होता. परंतू ८२१ मिलीमीटर इतका होता. याचा अर्थ असा की, २०२३ मध्ये पावसाळ्याचा हंगाम दीर्घ कालावधीत सरासरीच्या ९४ टक्के पाऊस झाला.

२०२४ मध्ये नैऋत्य मान्सून हा अलिकडच्या वर्षांतील सर्वोत्तम मानला गेल्याने पुढील काही महिन्यांत कृषी आणि संबंधित क्षेत्रात जीडीपी मध्ये वाढीचा वेग अधिक असेल, असे बहुतेक तज्ज्ञांना वाटते.

२०२४-२५ आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कृषी आणि अन्न प्रक्रिया उदयोगात सकल मूल्यवर्धित कमी अधिक वाढ झाली. काही पिकांच्या उत्पादनात घट झाल्यामुळे या आर्थिक वर्षात ४.२ टक्क्यांवरून स्थिर किंमतींवर २.७ टक्क्यांवर घसरली. 

याचे मुख्य कारण असे की, उष्णतेची लाट आल्यामुळे मान्सूनमध्ये कमी पावसाने देशभरातील अनेक राज्यांमधील बहुतांश जलाशय आटले, त्यामुळे अनेक पिकांच्या उत्पादनावरही परिणाम झाला. 

चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जून महिन्यांत अन्नधान्य चलनवाढीमुळे ४.१ टक्क्यांच्या तुलनेत ८.५ टक्के इतका वाढीचा अंदाज होता.  परंतू २०२४ मध्ये नैऋत्य मान्सून हा अलिकडे आल्याने पुढील काही महिन्यांत कृषी आणि संबंधित क्षेत्रात जीडीपीमध्ये वाढीचा वेग वाढेल, असे बहुतेक तज्ज्ञांना वाटते.

यावर्षी १ जून ते ३० ऑगस्ट या कालावधीत सरासरीपेक्षा ७ टक्के जास्त पाऊस झाला आहे. परिणामी, २३ ऑगस्ट २०२४ पर्यंत खरीप पिकांचे एकरी उत्पादन मागील वर्षी याच कालावधीत जवळपास २ टक्क्यांनी अधिक होते. त्यातुलनेत उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चांगल्या नैऋत्य मान्सूननेही जलाशय भरले आहेत, जे आगामी रब्बी पिकांच्या लागवडीस मदत करतील.

“आम्ही कृषी आणि संलग्न क्रियाकलापांसाठी पूर्ण वर्षाचा वाढीचा अंदाज ३.५-४ टक्के राखत आहोत. कारण आतापर्यंत मान्सून चांगला राहिला आहे. एप्रिल ते जून या कालावधीत उष्णतेच्या लाटेमुळे पिकांच्या उत्पादनात घट झाल्याने पहिल्या तिमाहीत घसरण झाली आहे.,” - मदन सबनवीस, मुख्य अर्थतज्ज्ञ, बँक ऑफ बडोद

टॅग्स :शेती क्षेत्रव्यवसायपैसापीक