Lokmat Agro >शेतशिवार > Agriculture Infrastructure Fund : कृषी पायाभूत सुविधा निधी AIF योजनेच्या उत्कृष्ट कामगिरीत महाराष्ट्र अव्वल

Agriculture Infrastructure Fund : कृषी पायाभूत सुविधा निधी AIF योजनेच्या उत्कृष्ट कामगिरीत महाराष्ट्र अव्वल

Agriculture Infrastructure Fund : Maharashtra tops in outstanding performance of Agriculture Infrastructure Fund AIF scheme | Agriculture Infrastructure Fund : कृषी पायाभूत सुविधा निधी AIF योजनेच्या उत्कृष्ट कामगिरीत महाराष्ट्र अव्वल

Agriculture Infrastructure Fund : कृषी पायाभूत सुविधा निधी AIF योजनेच्या उत्कृष्ट कामगिरीत महाराष्ट्र अव्वल

कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेच्या वर्ष २०२२-२३ साठी महाराष्ट्राने सर्वाधिक प्रस्ताव मंजूर करून देशपातळीवर दुसरा क्रमांक पटकावला आणि वर्ष २०२३-२४ मध्ये महाराष्ट्राने देशपातळीवर उत्कृष्ठ काम केलेले आहे.

कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेच्या वर्ष २०२२-२३ साठी महाराष्ट्राने सर्वाधिक प्रस्ताव मंजूर करून देशपातळीवर दुसरा क्रमांक पटकावला आणि वर्ष २०२३-२४ मध्ये महाराष्ट्राने देशपातळीवर उत्कृष्ठ काम केलेले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

कृषी तथा शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार तर्फे दिनांक ०३/०९/२०२४ रोजी कृषी पायाभूत सुविधा निधी योजने अंतर्गत देशातील विविध राज्याने/विविध बँकानी केलेल्या उत्कृष्ठ कामगिरी साठी AIF Excellance Award ने सन्मानित करण्यात आले.

सदरचा पुरस्कार वितरण कार्यक्रम C. Subramanyam Hall, New Auditorium, NASC Complex, PUSA New Delhi या ठिकाणी संपन्न झाला. योजनेच्या वर्ष २०२२-२३ साठी महाराष्ट्राने सर्वाधिक प्रस्ताव मंजूर करून देशपातळीवर दुसरा क्रमांक पटकावला आणि वर्ष २०२३-२४ मध्ये महाराष्ट्राने देशपातळीवर उत्कृष्ठ काम केलेले आहे.

शिवराजसिंह चौहान मंत्री कृषि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्या हस्ते सदर पारीतोषकाचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्रातर्फे सदर पुरस्कार अशोक किरनळी, कृषी संचालक, (आत्मा) कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी स्वीकारला.

सदर कार्यक्रमात रामनाथ ठाकूर, कृषि राज्य मंत्री, भगीरथ चौधरी कृषि राज्य मंत्री, शाजी के.बी. नाबार्ड चेअरमन, देवेश चतुर्वेदी कृषि सचिव, सम्मुअल प्रवीण कुमार संयुक्त सचिव (AIF), आणि आजनकुमार साहू संयुक्त सचिव (AIF) उपस्थित होते.

सर्व राज्यातून कृषि पायाभूत सुविधा निधी (AIF) योजने अंतर्गत लाभ घेतलेल्या प्रकल्पांचे उत्पादनाचा Stall लावण्यात आला होता. महाराष्ट्रातून पूजा प्रभाकर वायचळ, (गाव-खालापूर, जिल्हा-रायगड), संचालिका विद्यामंडळ फ्रुट्स प्रा.ली. यांचा Stall लावण्यात आला होता. सदर Stall ला केंद्रीय कृषि मंत्री यांनी भेट देऊन त्यांचा गौरव केला. 

कृषी पायाभूत सुविधा निधी योजने अंतर्गत २ कोटी मर्यादेपर्यतच्या योजने अंतर्गत पात्र सर्व कृषि पायाभूत सुविधा निधी (AIF) कर्जावर वार्षिक ३ टक्के व्याज सुट आहे. सदर सवलत ही जास्तीत जास्त ७ वर्षापर्यत उपलब्ध आहे.

तसेच पात्र कर्जधारकांसाठी सुक्ष्म व लघु उद्योजक योजनेच्या पत हमी निधी ट्रस्ट अंतर्गत २ कोटी पर्यंतच्या कर्जासाठी या वित्त पुरवठा सुविधेतुन पत हमी संरक्षण उपलब्ध आहे, या संरक्षणाकरीता लागणारे शुल्क शासनामार्फत भरण्यात येते.

शेतकरी उत्पादक संस्थेकरीता कृषि तथा शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली, विभागाच्या अधिनस्त असलेल्या लघु कृषक कृषि व्यापार संघामार्फत राबविण्यात येणाऱ्या पतहमी योजनेचा लाभ घेता येतो.

महाराष्ट्रासाठी वर्ष २०२५-२६ पर्यंत एकूण रु.८४६० कोटीचा लक्षांक आहे. महाराष्ट्रात दिनांक ३१/०८/२०२४ अखेर सदर योजने अंतर्गत विविध बँकांनी ८३५३ प्रकल्पासाठी ६११७ कोटी रुपये कर्ज मंजूर केलेले आहे. त्यापैकी ७१०८ प्रकल्पांना ३३०७ कोटी कर्ज वाटप केलेले आहे.

सदर योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी मा.आयुक्त कृषि रविंद्र बिनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य स्तरावर कृषी पायाभूत सुविधा निधी (AIF) कक्ष अशोक किरनळी संचालक आत्मा यांच्या स्तरावर कार्यरत आहे.

सदर कक्षाचे कार्यालय डीटीसी सेंटर, म्हात्रे पुलाजवळ, सहावा मजला कावेरी विंग, नळस्टोप, एरंडवने पुणे.येथे आहे. शेतकऱ्यांना किंवा लाभार्थींना योजनेबाबत अर्ज करतांना काहीही अडचण आल्यास कक्षातील एन. कावळे (राज्य समन्वयक) भ्रमण दूरध्वनी क्रमांक ८३१९०१०२३८, आणि धनंजय अग्निहोत्री (कृषी अधिकारी) भ्रमण दूरध्वनी क्रमांक ९८२२५८४१४० यांच्याशी संपर्क साधावा.
 

Web Title: Agriculture Infrastructure Fund : Maharashtra tops in outstanding performance of Agriculture Infrastructure Fund AIF scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.