Lokmat Agro >शेतशिवार > Agriculture Instrument : 'या' यंत्रांच्या वापराने शेतकऱ्यांच्या खर्चात होणार बचत; जाणून घ्या सविस्तर

Agriculture Instrument : 'या' यंत्रांच्या वापराने शेतकऱ्यांच्या खर्चात होणार बचत; जाणून घ्या सविस्तर

Agriculture Instrument: Farmers will save money by using 'this' machine; Know the details | Agriculture Instrument : 'या' यंत्रांच्या वापराने शेतकऱ्यांच्या खर्चात होणार बचत; जाणून घ्या सविस्तर

Agriculture Instrument : 'या' यंत्रांच्या वापराने शेतकऱ्यांच्या खर्चात होणार बचत; जाणून घ्या सविस्तर

Agriculture Instrument : देशातील संशोधक संस्थांनी मिळून शेतकऱ्यांसाठी पेरणीपासून कापणी व मळणीपर्यंतची यंत्रे तयार केली आहेत. या यंत्रांचा वापर केल्यास खर्च कमी होण्यास मदत होईल. वाचा सविस्तर (Agriculture Instrument)

Agriculture Instrument : देशातील संशोधक संस्थांनी मिळून शेतकऱ्यांसाठी पेरणीपासून कापणी व मळणीपर्यंतची यंत्रे तयार केली आहेत. या यंत्रांचा वापर केल्यास खर्च कमी होण्यास मदत होईल. वाचा सविस्तर (Agriculture Instrument)

शेअर :

Join us
Join usNext

निशांत वानखेडे

शेतकऱ्यांचे उत्पन्न 'दुप्पट' करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली होती. ही घोषणा सत्यात उतरेल, असा दावा 'व्हीएनआयटी'चे प्रा. डॉ. दिलीप पेशवे (Prof. Dr. Dilip Peshwa) यांनी केला आहे. (Agriculture Instrument)

व्हीएनआयटी व देशातील इतर संशोधक संस्थांनी मिळून शेतकऱ्यांसाठी पेरणीपासून कापणी व मळणीपर्यंतची यंत्रे तयार केली आहेत. या यंत्रांचा वापर केल्यास खर्च कमी होईल व शेतकऱ्यांचे उत्पन्न २५० टक्के वाढेल, असा विश्वास डॉ. पेशवे (Prof. Dr. Dilip Peshwa) यांनी व्यक्त केला आहे.(Agriculture Instrument)

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (व्हीएनआयटी) येथे त्यांनी या यंत्राच्या उपयोगितेचे सादरीकरण केले. ही यंत्र विशेषतः अल्पभूधारक शेतकऱ्यांना गृहीत धरूनच तयार केल्याचे त्यांनी सांगितले.(Agriculture Instrument)

एका एकरातील गव्हाच्या पेरणीपासून ते मळणीपर्यंत साधारणतः २० ते २२ हजारांचा खर्च येतो. समजा त्यांचा गहू ३० हजारांत विकला तर केवळ ८ ते १० हजारांचे उत्पन्न होईल.

मात्र, व्हीएनआयटीच्या तंत्राने शेती केल्यास शेतकऱ्यांना पूर्ण कार्यासाठी केवळ ३,५०० ते ४००० रुपये खर्च लागेल व २५,००० ते २६,००० नफा मिळेल, असा विश्वास डॉ. पेशवे यांनी व्यक्त केला.(Agriculture Instrument)

खते किंवा कीटकनाशकांवर शेतकऱ्यांचा बराच पैसा जातो. यावर उपाय म्हणून व्हीएनआयटीच्या केमिकल इंजिनिअरिंग विभागाने गोमूत्र व शेणापासून कीटकनाशके तयार केले आहेत.

या पंचगव्याचा वापर केल्यास पिकांवर कोणताही रोग लागणार नाही. यामुळे खते व कीटकनाशकांचा २ ते ३ हजार रुपयांचा खर्च वाचेल. सदर यंत्र खरेदी करण्यासाठी ३५०० ते ४००० रुपये खर्च लागेल त्यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात बचत होऊन २५,००० ते २६,००० रुपये नफा मिळेल. (Agriculture Instrument)

'हे' आहेत उपयोगाला येणारे यंत्र (Agriculture Instrument)

* नांगरणीसाठी बूलक ट्रॅक्टर तयार केला. नांगरणीच्या अवजारांना चाके लावली. यामुळे बैलावरील वजन कमी होईल आणि वेगाने नांगरणी होईल.

* पेरणीसाठी ड्रम सिडर : एक गोल ड्रम आहे. त्यास टोकदार छिद्र आहेत. या छिद्रातून धान्य जमिनीत पेरले जाईल. वेगाने काम होईल.

* निंदण काढण्यासाठी 'विकल्प व्हिडर' : निंदण करणाऱ्या महिला किंवा पुरुषांना अनेक तास शेतात बसून निंदण करावे लागते. 'विकल्प व्हिडर'द्वारे एकच व्यक्त्ती वेगाने पिकांना हानी न पोहोचता शेतातील अनावश्यक तण काढू शकतो. यात आता लिथियम आयन बॅटरी लावली आहे, ज्यामुळे आवाज किंवा प्रदूषण होत नाही.

* विकल्प हार्वेस्टिंग : तासन् तास विळ्याने पीक कापण्याची गरज नाही. एक किंवा दोन व्यक्ती उभ्यानेच कमी वेळात पिकांची कापणी करू शकेल.

* मळणी यंत्रही आहे. शिवाय धान्य सोंगण्याचे 'स्कायथे' नावाचे यंत्र तयार केले आहे. याद्वारे शेतातील सौर पॅनलचा वापर करून शेतातच धान्याची सोंगणी करता येईल.

* विकल्प सोलर पंप : सौरऊर्जेच्या मदतीने एका तासात २५ हजार लिटर पाणी (साध्या पंपापेक्षा दुप्पट) देणे शक्य आहे.

देशभरातील विविध संस्थांद्वारे यावर कार्य सुरू आहे. उत्तर प्रदेश, गुजरात अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी या यंत्रांचा उपयोग सुरू केला आहे. विदर्भात आम्ही पोहोचू शकलो नाही; पण यापुढे विदर्भातही या तंत्राचा प्रचार-प्रसार करण्यात येईल. - डॉ. दिलीप पेशवे, विभागप्रमुख, एमएमई, व्हीएनआयटी

हे ही वाचा सविस्तर : Reshim sheti : कमी खार्चात अधिक उत्पादन देणारी रेशीम शेतीच भारी

Web Title: Agriculture Instrument: Farmers will save money by using 'this' machine; Know the details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.