Agriculture News :
कन्नड येथील साडेतीन एकर क्षेत्रात तब्बल ६४ लाख रुपयांचे डाळिंबाचे उत्पन्न घेऊन तालुक्यात विक्रम करणाऱ्या अंधानेर येथील नितीन गायके यांच्या शेतात जाऊन तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्यासह पोलिस, कृषी विभाग, नगर परिषदेमधील अधिकाऱ्यांनी या फळबागेची पाहणी करून समाधान व्यक्त केले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी गायके यांच्या कर्तबगारीबद्दल कौतुक केले.
अंधानेर येथील नितीन गायके यांच्या शेतात जाऊन अधिकाऱ्यांनी डाळिंब फळाची पाहणी केली. यावेळी तहसीलदार विद्याचरण कडवकर, तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक आदी
गायके आदी उपस्थित होते.
गायके हे कृषी पदवीधर आहेत. त्यांनी नोकरीच्या मागे न लागता उत्तम प्रकारे शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतात भगवा वाणाच्या डाळिंबाची लागवड केली आहे.
१६२ रुपये प्रतिकिलो दराने शेतात येऊन व्यापारी डाळिंब खरेदी करीत आहेत. पाच वर्षांपासून दरवर्षाला ते चाळीस ते पन्नास लाखांचे उत्पन्न या बागेतून घेत आहेत. दरम्यान, ८ ऑगस्ट रोजी त्यांच्या शेतात येऊन तहसीलदार विद्याचरण कडवकर, तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक, न.प.चे मुख्याधिकारी नंदकिशोर भोंबे, पोलिस उपाधीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी फळबागाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. यावेळी प्रगतशील शेतकरी तेजराव बारगळ, कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.