Lokmat Agro >शेतशिवार > Agriculture Scheme : उत्पादन विकासासाठी आता कृषी विभाग घेणार पुढाकार 

Agriculture Scheme : उत्पादन विकासासाठी आता कृषी विभाग घेणार पुढाकार 

Agriculture Scheme: Agriculture department will now take the initiative for product development  | Agriculture Scheme : उत्पादन विकासासाठी आता कृषी विभाग घेणार पुढाकार 

Agriculture Scheme : उत्पादन विकासासाठी आता कृषी विभाग घेणार पुढाकार 

Agriculture Scheme : शेतकऱ्यांनी पारंपारिक पीक पध्दतीकडे वाळावे यासाठी कृषी विभाग राबविणार मुल्यवर्धनसाखळी विकास कार्यक्रम

Agriculture Scheme : शेतकऱ्यांनी पारंपारिक पीक पध्दतीकडे वाळावे यासाठी कृषी विभाग राबविणार मुल्यवर्धनसाखळी विकास कार्यक्रम

शेअर :

Join us
Join usNext

कापूस, सोयाबीन व तेलबिया पिकांची उत्पादकता वाढीसाठी मूल्यवर्धनसाखळी विकासावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. राज्य पुरस्कृत या योजनेसाठी कृषी विभागाने पुढाकार घेत शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी आराखडा तयार केला आहे.
राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकास योजना अंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर राबविण्यात येत असून, कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पद्धतीस चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.
कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्य साखळीस चालना देण्यात येणार आहे. या उद्देशाने राज्य पुरस्कृत विशेष कृती योजना २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षांत राबविण्यात येत आहे. २०२४-२५ मध्ये योजनेंतर्गत चालू हंगामामध्ये 'बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप' या बाबीचा १०० टक्के अनुदानावर पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जातून ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर १४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

संकेत स्थळावरून करता येणार अर्ज
कृषी यांत्रिकीकरण उप अभियाना अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहेत. याकरिता संकेतस्थळावर जाऊन शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
 

Web Title: Agriculture Scheme: Agriculture department will now take the initiative for product development 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.