कापूस, सोयाबीन व तेलबिया पिकांची उत्पादकता वाढीसाठी मूल्यवर्धनसाखळी विकासावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. राज्य पुरस्कृत या योजनेसाठी कृषी विभागाने पुढाकार घेत शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी आराखडा तयार केला आहे.राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकास योजना अंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर राबविण्यात येत असून, कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पद्धतीस चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्य साखळीस चालना देण्यात येणार आहे. या उद्देशाने राज्य पुरस्कृत विशेष कृती योजना २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षांत राबविण्यात येत आहे. २०२४-२५ मध्ये योजनेंतर्गत चालू हंगामामध्ये 'बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप' या बाबीचा १०० टक्के अनुदानावर पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जातून ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर १४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
संकेत स्थळावरून करता येणार अर्जकृषी यांत्रिकीकरण उप अभियाना अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहेत. याकरिता संकेतस्थळावर जाऊन शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.