Join us

कृषी वसंत अभियानाला सुरुवात; शेतकऱ्यांना दिले जातेय मार्गदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2024 12:27 PM

आधी शक्ती तपासा; मग सोयाबीन पेरा!

शेतकऱ्यांनी आधी उगवण शक्ती तपासावी, नंतर सोयाबीन पेरणी - करावी, असे प्रतिपादन आत्माचे प्रकल्प संचालक आत्मा डॉ. मुरली - इंगळे यांनी केले.

जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या संकल्पनेतून यावर्षी खरीप हंगामात कृषी वसंत अभियान राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने तालुका कृषी अधिकारी अकोला जि. अकोला व (आत्मा) यांच्यावतीने अकोला तालुक्यातील कापशी (तलाव) येथे खरीप पूर्व शेतकरी सभेचे आयोजन करण्यात आले होते.

अकोला जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी होते आहे. पावसावर अवलंबून असलेल्या खरीप शेतीसाठी शेतकऱ्यांना इतर पिकापेक्षा थोडे किफायत आणि हातात पैसे देणारे पीक म्हणून सोयाबीन पेरा वाढला.

गावोगावी बैठकीचे आयोजन

सोयाबीन बियाणे घरच्या घरी उगवण चाचणी कशी करावी, याबाबत प्रात्यक्षिक करून शेतकऱ्यांना गावोगावी बैठकीचे आयोजन करून तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येत आहे. याप्रसंगी मंडळ कृषी अधिकारी प्रदीप राऊत, आत्मा यंत्रणाचे तालुका तंत्र व्यवस्थापक व्ही.एम. शेगोकार यांची उपस्थिती होती.

शेतकऱ्यांना करून दाखविले प्रात्यक्षिक

डॉ. इंगळे यांनी सेंद्रिय शेतीचे फायदे, नैसर्गिक शेती, आत्मा योजना, शेतीपूरक प्रक्रिया उद्योग, स्मार्ट योजना, शेतीमध्ये रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खताचा वापर, माती परीक्षण, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क याविषयी तांत्रिक मार्गदर्शन केले तसेच उपस्थित शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी घरच्या घरी सोयाबीन उगवण चाचणी कशी करावी, याविषयी प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले.

या विषयावर केले मार्गदर्शन

प्रदीप राऊत यांनी पेरणीपूर्वी सोयाबीन बियाणे बीजप्रक्रिया, रोजगार हमी योजना, फळबाग लागवड याविषयी मार्गदर्शन केले तर आत्मा यंत्रणाचे शेगोकार यांनी एकात्मिक कीड रोग नियंत्रण, खरीप पिकाचे लागवड तंत्रज्ञान, खरीप हंगामातील सुधारित वाण, याविषयी तांत्रिक मार्गदर्शन केले. त्यानंतर कृषी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

हेही वाचा - निंबोळी अर्काच्या वापरामुळे वाचतो २५ टक्क्याहून अधिक कीटकनाशकांचा खर्च

टॅग्स :सोयाबीनशेतीशेतकरीपीक व्यवस्थापन