Join us

AgriSURE Fund : स्टार्टअप्स आणि ग्रामीण उद्योजकांसाठी खुशखबर आली कृषीविषयक निधी योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2024 9:16 AM

कृषी क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण प्रगती करताना, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्ली येथे ऍग्रीशुअर निधी AgriSURE Fund योजनेचा प्रारंभ केला.

कृषी क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण प्रगती करताना, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्ली येथे ऍग्रीशुअर निधी योजनेचा प्रारंभ केला.

AgriSURE -स्टार्टअप्स आणि ग्रामीण उद्योजकांसाठी कृषीविषयक निधी, हा एक नाविन्यपूर्ण निधी आहे जो भारतातील कृषी क्षेत्रात क्रांती घडवण्याच्या दिशेने एक अग्रगण्य पाऊल आहे.

तंत्रज्ञानाधारित, उच्च-जोखीम, उच्च-प्रभावपूर्ण उपक्रमांवर लक्ष केंद्रित करून, ऍग्रीशुअर ची रचना कृषी आणि ग्रामीण स्टार्ट-अप परिसंस्थेत वाढीस चालना देण्यासाठी आणि नवकल्पना वाढवण्यासाठी केली आहे.

यासाठी सेबी नोंदणीकृत श्रेणी II, पर्यायी गुंतवणूक निधी (एआयएफ) सह २५० कोटी रुपयांचा मिश्र भांडवल निधी असून भारत सरकारचे योगदान २५० कोटी रुपये, नाबार्डचे २५० कोटी रुपये, आणि २५० कोटी रुपये बँका, विमा कंपन्या आणि खाजगी गुंतवणूकदारांकडून उभे केले जात आहेत. 

आपल्या बीजभाषणात शिवराज सिंह चौहान यांनी नव्याने सुरू केलेल्या उपक्रमांच्या परिवर्तनीय क्षमतेवर प्रकाश टाकला.

शेतकरी समुदायाला पाठबळ देण्याच्या सरकारच्या बांधिलकीविषयी स्पष्टीकरण देताना चौहान यांनी सांगितले की, प्रत्येक शेतकऱ्याला सक्षम बनवण्याचा आमचा दृष्टीकोन असून ऍग्रीशुअर निधी योजनेची सुरुवात म्हणजे कृषी क्षेत्राप्रती कटिबद्धतेचे द्योतक आहे आहे.

ऍग्रीशुअर निधी सुरू करून, कृषी क्षेत्रात आणखी गुंतवणूक वाढवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे जे शेतकऱ्यांना सक्षम बनवेल आणि सुलभ आणि परवडणाऱ्या नाविन्यपूर्ण उपायांना गती देऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देईल.

टॅग्स :केंद्र सरकारसरकारशेती क्षेत्रकृषी योजनासरकारी योजनाशिवराज सिंह चौहानबँक