Lokmat Agro >शेतशिवार > Agro Advisory : मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिल्या आहेत 'या' शिफारशी वाचा सविस्तर

Agro Advisory : मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिल्या आहेत 'या' शिफारशी वाचा सविस्तर

Agro Advisory: Marathwada University has given 'these' recommendations, read in detail | Agro Advisory : मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिल्या आहेत 'या' शिफारशी वाचा सविस्तर

Agro Advisory : मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिल्या आहेत 'या' शिफारशी वाचा सविस्तर

Agro Advisory : वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी पीक निहाय कृषी सल्लाची शिफारस दिली आहे. ती वाचा सविस्तर

Agro Advisory : वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी पीक निहाय कृषी सल्लाची शिफारस दिली आहे. ती वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी पीक निहाय कृषी सल्लाची शिफारस दिली आहे. बदलत्या वातावरणात पिकांची आणि पशुंची काळजी कशी घ्यावी याची माहिती दिली आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात येत्या २ दिवसात कमाल तापमानात १ ते २ अंश सेल्सिअसने वाढ होऊन त्यानंतर १ ते २ अंश सेल्सिअसने घट होण्याची तर पुढील ३ ते ४ दिवसात किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होऊन त्यानंतर हळूहळू २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात येत्या २ दिवसात कमाल तापमानात १ ते २ अंश सेल्सिअसने वाढ होऊन त्यानंतर १ ते २ अंश सेल्सिअसने घट होण्याची तर पुढील ३ ते ४ दिवसात किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होऊन त्यानंतर हळूहळू २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात ३० जानेवारीपर्यंत पाऊस नाही, कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीएवढे व ३१ जानेवारी ते ६ फेब्रुवारी यादरम्यान पाऊस नाही, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त व किमान तापमान छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त तर इतर जिल्ह्यात सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

संदेश : पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषी सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

ऊस :
ऊस पिकास आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. ऊस पिकात खुरपणी करून तण नियंत्रण करावे. हंगामी/सुरू ऊस पिकाची लागवड करावी. हंगामी ऊसाची लागवड १५ फेब्रुवारी पर्यंत करता येते.

हळद :
हळद पिकात आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. हळद पिकाच्या काढणीस साधारणत: फेब्रुवारी महिन्यात सुरूवात होते. काढणी करण्यापूर्वी पंधरा दिवस आधी  पिकाला पाणी देणे बंद करावे.

हरभरा :
हरभरा पिकास आवश्यकतेनुसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. हरभरा पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. ढगाळ वातावरणामूळे हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर २० पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी २ कामगंध सापळे लावावेत.

हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असतांना  ५ % निंबोळी अर्काची किंवा ३०० पीपीएम अझाडीरेकटीन ५० मिली प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी घ्यावी. अळी अवस्था लहान असताना एच.ए.एन.पी.व्ही ५०० एल.ई. विषाणूची १० मिली प्रति १० लिटर पाणी (२०० मिली प्रति एकर) याप्रमाणे फवारणी करावी. तर किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर इमामेक्टिन बेंझोएट ५ % - ४.५ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे (प्रती एकर ८८ ग्रॅम) किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल १८.५ % - ३ मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे (प्रती एकर ६० मिली) किंवा फ्लुबेंडामाईड २०% - ५ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे (प्रती एकर १२५ ग्रॅम) फवारावे.

करडई :

करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट ३०% १३ मिली किंवा असिफेट ७५% १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पिकात आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. उन्हाळी तीळ पिकाच्या पेरणीसाठी पूर्वमशागतीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर करून घ्यावीत.

उन्हाळी तीळ :

उन्हाळी तीळ पिकाच्या पेरणीसाठी एकेटी-१०१, एकेटी-१०३, जेएलटी-४०८, एकेटी-६४, एनटी-११-९१ या वाणांपैकी वाणाची निवड करावी. उन्हाळी तीळ पिकाची पेरणी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत करता येते.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

संत्रा/मोसंबी बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. संत्रा/मोसंबी बागेत अन्नद्रव्‍याची कमतरता दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी ००:५२:३४ १५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  

डाळींब :
काढणीस असलेल्या डाळींब फळांची काढणी करून घ्यावी. डाळींब फळांची काढणी झाल्यानंतर बागेतील वाळलेल्या व रोगग्रस्त फांद्या काढून टाकाव्यात व बाग स्वच्छ करावी. डाळींब बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

चिकू :
चिकू बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे व आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.

भाजीपाला

वांगे भाजीपाला पिकात शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास प्रादुर्भाव ग्रस्त शेंडे व फळे गोळा करून नष्ट करावेत व त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 2 कामगंध सापळे लावावेत किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल १८.५% एससी ४ मिली किंवा क्लोरपायरीफॉस २०% एससी २० मिली किंवा सायपरमेथ्रीन १०% ईसी ११ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

भाजीपाला पिकात खुरपणी करून भाजीपाला पीक तण विरहीत ठेवावे व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी.

उन्हाळी हंगामासाठी (टोमॅटो, वांगे, मिरची) भाजीपाला पिकाची रोपे तयार करण्यासाठी गादी वाफ्यावर बी टाकावे तर वेलवर्गीय व भेंडी पिकाची लागवड करावी.

फुलशेती

फुल पिकात खुरपणी करून फुल पिक तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी.

तुती रेशीम उद्योग

भारत देशात ६ ते ७ प्रकारचे कोळी किटकांचा तुती बागेवर प्रादुर्भाव होतो त्यात टेट्रानायचस इक्विटो रोस व टेट्रानायचस लूडिनी हृया होत. कुन्नूर तमिळनाडू येथे प्रथम इयूटेट्रानायचस अरीयंटलीस या कोळी किटकाचा तुती बागेवर प्रादुर्भाव दिसून आला.

पिवळे ब्रॉड माइट या बहुभक्षी कोळी किटकाचा पॉली फॅगोटेट्रानिमस लॅटस कुन्नूर तमीळनाडू येथे तुती बागेत प्रादुर्भाव आढळुन प्रथम हा दुर्मीळ प्रादुर्भाव करणारा कोळी किटक मोठ्या प्रमाणावर तुती बागेवर प्रादुर्भाव करत आहे.

सन २०१९-२० मध्ये कर्नाटक व तमिळनाडू राज्यातील तुती बागेचे नुकसान करत असून सन २०२२-२३ मध्ये महाराष्ट्र राज्यातील तुती बागेत दिसून आला आहे. तुतीची नविन वाढ जळाल्यासारखे पिवळे पडताव व वाळतात. बागेवर ८० टक्के गंधक ३ ग्रॅम प्रति लिटर फवारणी करावी नंतर ५ दिवसांनी तुती पाने खाऊ खालावेत.

पशुधन व्यवस्थापन

जनावरे आजारी पडू नयेत म्हणून पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जनावरांना जंतनाशक पाजावेत व लसीकरण करून घ्यावे.  दूध व्यवसाय करताना आपल्या शंकांच्या निरसनासाठी अनुक्रमे १८००-२३३-०४१८ आणि १८००-२३३-३२६८ या टोल फ्रि क्रमांकावर कॉल करून पशुसंवर्धन खाते व पशुवैद्यक विद्यापीठाशी संपर्क करा.

(सौजन्‍य: मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

हे ही वाचा सविस्तर :
Maharashtra Weather Update : राज्यात उकाड्याला सुरूवात; वाचा IMD चा सविस्तर रिपोर्ट

Web Title: Agro Advisory: Marathwada University has given 'these' recommendations, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.