Join us

Agro Advisory : रेशीम शेतीसह पिकांना विद्यापीठाने काय दिला सल्ला ते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 10:50 IST

Agro Advisory : मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीने कृषी सल्ला दिला आहे. तो वाचा सविस्तर

रेशीम शेतीसह पिकांना मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीने कृषी सल्ला (Agro Advisory) दिला आहे. तो वाचा सविस्तर

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील चार दिवस हवामान(Weather) कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात पुढील ४ ते ५ दिवसात कमाल तापमानात हळूहळू वाढ होण्याची तर पुढील ३ ते ४ दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.

हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील चार दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात पुढील ४ ते ५ दिवसात कमाल तापमानात हळूहळू वाढ होण्याची तर पुढील ३ ते ४ दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात १७ ते २३ जानेवारीदरम्यान पाऊस (Rain) सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे व २४ ते ३० जानेवारी दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

संदेश : पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापनऊसऊस पिकास आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. नविन लागवड केलेल्या ऊस पिकात खुरपणी करून तण नियंत्रण करावे. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस २०% २५ मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल १८.५% ४ मिली प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  

हळदहळद पिकात आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. हळद पिकात कंदमाशीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी १५ दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस २५% २० मिली किंवा डायमिथोएट ३०% १५  मिली यापैकी एका किटकनाशकाची प्रति १० लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी.(हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामुळे विद्यापीठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत). उघड्या पडलेल्या कंदाजवळ कंदमाशीची मादी अंडी घालते त्यामुळे, उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत व वेळेवर हळदीची भरणी करावी.  

हरभराहरभरा पिकास आवश्यकतेनुसार तुषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. हरभरा पिकात पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यावी. ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर २० पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी २ कामगंध सापळे लावावेत.

हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असतांना  ५ % निंबोळी अर्काची किंवा ३०० पीपीएम अझाडीरेकटीन ५० मिली प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी घ्यावी. अळी अवस्था लहान असताना एच. ए. एन. पी. व्ही ५०० एल.ई. विषाणूची १० मिली प्रति १० लिटर पाणी (२०० मिली प्रति एकर) याप्रमाणे फवारणी करावी. तर किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर इमामेक्टिन बेंझोएट ५% - ४.५ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे (प्रती एकर ८८ ग्रॅम) किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल १८.५% - ३ मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे (प्रती एकर ६० मिली) किंवा फ्लुबेंडामाईड २०% - ५ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे (प्रती एकर १२५ ग्रॅम) फवारावे.

करडईकरडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट ३०% १३ मिली किंवा असिफेट ७५% १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पिकात आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

मृग बहार धरलेल्या संत्रा/मोसंबी बागेत फळ वाढीसाठी ००:५२:३४ १५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. अंबे बहार धरलेल्या संत्रा/मोसंबी बागेत वाळलेल्या व रोगग्रस्त फांद्याची छाटणी करावी व छाटणी केलेल्या फांद्यावर बोर्डो पेस्ट लावावी.

संत्रा/मोसंबी बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. संत्रा/मोसंबी बागेत आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

काढणीस असलेल्या डाळींब फळांची काढणी करून घ्यावी. डाळींब फळांची काढणी झाल्यानंतर बागेतील वाळलेल्या व रोगग्रस्त फांद्या काढून टाकाव्यात व बाग स्वच्छ करावी. डाळींब बागेस आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. चिकू बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे व आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.

भाजीपाला

वांगे भाजीपाला पिकात शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास प्रादुर्भाव ग्रस्त शेंडे व फळे गोळा करून नष्ट करावेत व त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 2 कामगंध सापळे लावावेत किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल १८.५% एससी ४ मिली किंवा क्लोरपायरीफॉस २०% एससी २० मिली किंवा सायपरमेथ्रीन १०% ईसी ११ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप बघून फवारणी करावी.

मिरची व गवार पिकावर पावडरी मिल्ड्यू रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मायक्लोब्यूटॅनिल १०% डब्ल्यूपी १० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप बघून फवारणी करावी.

भाजीपाला पिकात खुरपणी करून भाजीपाला पिक तण विरहीत ठेवावे व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची पिकाची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

फुल पिकात खुरपणी करून फुल पिक तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी.

तुती रेशीम उद्योग

भारत देशात ६ ते ७ प्रकारचे कोळी किटकांचा तुती बागेवर प्रादुर्भाव होतो त्यात टेट्रानायचस इक्विटो रोस व टेट्रानायचस लूडिनी हृया होत.

कुन्नूर तमिळनाडू येथे प्रथम इयूटेट्रानायचस अरीयंटलीस या कोळी किटकाचा तुती बागेवर प्रादुर्भाव दिसून आला. पिवळे ब्रॉड माइट या बहुभक्षी कोळी किटकाचा पॉली फॅगोटेट्रानिमस लॅटस कुन्नूर तमिळनाडू येथे तुती बागेत प्रादुर्भाव आढळुन प्रथम हा दुर्मिळ प्रादुर्भाव करणारा कोळी किटक मोठ्या प्रमाणावर तुती बागेवर प्रादुर्भाव करत आहे.

सन २०१९-२० मध्ये कर्नाटक व तमिळनाडू राज्यातील तुती बागेचे नुकसान करत असून सन २०२२-२३ मध्ये महाराष्ट्र राज्यातील तुती बागेत दिसून आला आहे. तुतीची नविन वाढ जळाल्यासारखे पिवळे पडताव व वाळतात. बागेवर ८० टक्के गंधक ३ ग्रॅम प्रति लिटर फवारणी करावी नंतर ५ दिवसांनी तुती पाने काढून टाकावेत.

पशुधन व्यवस्थापन

जनावरे आजारी पडू नयेत म्हणून पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जनावरांना जंतनाशक पाजावेत व लसीकरण करून घ्यावे. दूध व्यवसाय करताना आपल्या शंकांच्या निरसनासाठी अनुक्रमे १८००-२३३-०४१८ आणि १८००-२३३-३२६८ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून पशुसंवर्धन खाते व पशुवैद्यक विद्यापीठाशी संपर्क साधावा.

(सौजन्‍य : मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

हे ही वाचा सविस्तर : Farmers Suicide : वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांची चतुःसूत्री शेतकऱ्यांसाठी ठरणार नवं संजीवनी वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीमराठवाडाकृषी विज्ञान केंद्रपीक व्यवस्थापन