Lokmat Agro >शेतशिवार >ॲग्री प्रॉडक्ट्स > Sugar factory : राज्यातील ऊस उत्पादकांची संपली प्रतीक्षा ; कारखान्यांचे वाहतूक दर जाहीर वाचा सविस्तर

Sugar factory : राज्यातील ऊस उत्पादकांची संपली प्रतीक्षा ; कारखान्यांचे वाहतूक दर जाहीर वाचा सविस्तर

Sugar factory : The wait is over for sugarcane growers in the state; Read the details of the transport rates of the factories | Sugar factory : राज्यातील ऊस उत्पादकांची संपली प्रतीक्षा ; कारखान्यांचे वाहतूक दर जाहीर वाचा सविस्तर

Sugar factory : राज्यातील ऊस उत्पादकांची संपली प्रतीक्षा ; कारखान्यांचे वाहतूक दर जाहीर वाचा सविस्तर

मागील हंगामात २०८ पैकी २० साखर कारखान्यांनी १ हजार रुपयांपेक्षा अधिकचा दर आकारला होता, अशी माहिती परिपत्रकातून साखर आयुक्तांनी प्रसिध्द केली आहे. (Sugar factory)

मागील हंगामात २०८ पैकी २० साखर कारखान्यांनी १ हजार रुपयांपेक्षा अधिकचा दर आकारला होता, अशी माहिती परिपत्रकातून साखर आयुक्तांनी प्रसिध्द केली आहे. (Sugar factory)

शेअर :

Join us
Join usNext

Sugar factory  : राज्यातील ऊस गाळप हंगामाला सुरुवात झाली आहे. राज्यातील ऊस उत्पादकांना उत्सुकता लागलेले ऊस तोडणी व वाहतुकीचे दर साखर आयुक्तालयाने नुकतेच जाहीर केले आहेत. 
 
मागील हंगामात २०८ पैकी २० साखर कारखान्यांनी १ हजार रुपयांपेक्षा अधिकचा दर आकारला होता, अशी माहिती परिपत्रकातून साखर आयुक्तांनी प्रसिध्द केली आहे.

काही कारखाने ऊस तोडणी आणि वाहतूक खर्च शेतकऱ्यांकडून भरमसाठ रकमा घेतात. पूर्वी कोणत्या कारखान्याने नेमक्या किती रकमा कापल्या हे गोपनीय ठेवले जात होते. परंतू आता साखर आयुक्तालयाने ऊस तोडणी व वाहतूक दर घोषित करण्याची आदर्श पद्धत सुरू केली आहे. त्यामुळे आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ही माहिती समजते.   

ऊस नियंत्रण आदेश, १९६६ मधील कलम २ आणि ३ नुसार रास्त आणि किफायतशीर दराबाबत उल्लेख करण्यात आलेला आहे. गेल्या हंगामात राज्यातून २०८ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी केला होता. 

त्याचबरोबर ऊसाची खरेदी करताना कायद्यानुसार, शेतकऱ्यांचा ऊस हा साखर कारखान्याच्या दरात घेवून जाणे बंधनकारक असते, अशी महाराष्ट्रात परिस्थिती आहे. 

मात्र, उत्तर भारतातील शेतकरी स्वतः ऊसाची तोडणी करून वाहतूक करत ऊस कारखान्यामध्ये आणून देत असतात. परंतु महाराष्ट्राची स्थिती वेगळी आहे. राज्यातील शेतकरी हे स्वत: ऊस तोडणी करत नसून तोडणी आणि वाहतूक अशी दोन्ही कामे साखर कारखानेच करत असतात. त्यामुळे तोडणी आणि वाहतुकीचा खर्च हा एफआरपीमधून रक्कम वजा केली जाते.

साखर आयुक्त यांनी सांगितले की, सध्या सुरू असलेल्या हंगामात ऊस देताना मागील ऊस तोडणी आणि वाहतूक दराचा अभ्यास करावा. त्यानंतरच तोडणी आणि वाहतुकीबाबत निर्णय शेतकऱ्यांनी घ्यावा. 

एखादा कारखाना जास्त दर आकारत असेल तर  त्याठिकाणी शेतकऱ्यांनी स्वत: ऊस तोडून करुन कारखान्याला नेवून देण्याचा अधिकार आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यात गेल्या हंगामात कोणत्या साखर कारखान्याने ऊस तोडणी व वाहतूक खर्च नेमका किती आकारला हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना समजणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या बिलातून कमीत कमी ऊस तोडणी व वाहतूक रक्कम वजा व्हावी, यासाठी खर्चाची यादी जाहीर करण्यात आली आहे. - डॉ. कुणाल खेमनार, साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे 

दर कमी जास्त 

मागील वर्षी तोडणी आणि वाहतूक खर्चाबाबत एम. जे. शुगर डिस्टलरी ॲण्ड पॉवर प्रा. रावळगांव, जि. नाशिक (१३३४.९८ रुपये प्रति मे. टन)  या कारखान्याने सर्वाधिक दर आकारले तर श्री. वृध्देश्वर सहकारी साखर कारखाना लि. आदिनाथनगर, ता. पाथर्डी  जि. अहमदनगर (६६२.३२ रुपये प्रति मे. टन) या कारखान्याने सर्वात कमी दर आकारले.

तोडणी आणि वाहतूकीबाबत सर्वाधिक दर आकारणारे पहिले दहा कारखाने  

१. एम.जे. शुगर डिस्टलरी ॲण्ड पॉवर प्रा. रावळगांव, जि. नाशिक (१३३४.९८ रुपये प्रति मे. टन)

२. मानस अॅग्रो इंडस्ट्रीज ॲण्ड इन्फास्ट्रक्चर लि. युनिट-1, बेला, उमरेड. जि. नागपूर (११९३.६३ रुपये प्रति मे. टन)

३. भैरवनाथ शुगर वर्क्स लिज वसंत ससाका, ता. पुसद, जि. यवतमाळ (१५५९.१५ रुपये प्रति मे. टन)

४. सोपानराव बाळकृष्ण धसाळ ॲग्रो प्रा. लि., माळकुप, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर (११०३.०१ रुपये प्रति मे. टन)

५. संत मुक्ताई शुगर ॲण्ड एनर्जी लि., घोडसगांव, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव (१०९६.७९ रुपये प्रति मे. टन) 

६. श्री गजानन महाराज शुगर प्रा. लि., कौठे मलकापूर ता. संगमनेर जि. अहिल्यानगर (१०९५.९७ रुपये प्रति मे. टन) 

७. पियूष शुगर ॲण्ड पॉवर प्रा. लि., वाळकी, ता. अहिल्यानगर ( १०८२.९७ रुपये प्रति मे. टन) 

८. व्यंकटेश्वरा पॉवर प्रोजेक्ट लि. श्रीरामनगर, मौदा रामटेक रोड ता.मौदा, नागपूर (१०७९ रुपये प्रति मे. टन)
  
९. सिद्धनाथ शुगर मिल्स लि. तिऱ्हे,  ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर (१०७५.५५ रुपये प्रति मे. टन) 

१०. बारामती ॲग्रो लि., शेटफळगढे ता. इंदापूर, जि. पुणे (१०७३.१० रुपये प्रति मे. टन)

Web Title: Sugar factory : The wait is over for sugarcane growers in the state; Read the details of the transport rates of the factories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.