Lokmat Agro >शेतशिवार > Kharip Crop Loan: खरीप अवघ्या आठ दिवसांवर आला, पण शेतकऱ्यांना मिळेना पीक कर्ज

Kharip Crop Loan: खरीप अवघ्या आठ दिवसांवर आला, पण शेतकऱ्यांना मिळेना पीक कर्ज

ahead of Kharif season farmers could not get crop loans by banks | Kharip Crop Loan: खरीप अवघ्या आठ दिवसांवर आला, पण शेतकऱ्यांना मिळेना पीक कर्ज

Kharip Crop Loan: खरीप अवघ्या आठ दिवसांवर आला, पण शेतकऱ्यांना मिळेना पीक कर्ज

खरीप तोंडावर आला तरीही शेतकरी बांधवांना अजूनही पीक कर्ज मिळत नाहीये.

खरीप तोंडावर आला तरीही शेतकरी बांधवांना अजूनही पीक कर्ज मिळत नाहीये.

शेअर :

Join us
Join usNext

अभय लांजेवार

उमरेड : निसर्गाच्या उलटचक्राने रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिसकावला. पिकांना जबरदस्त फटका बसला. शेतमालाला मातीमोल भाव मिळाला. आता खरिपाच्या तयारीसाठी शेतकरी पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी सावकार आणि बँकांच्या दिशेने धावू लागले आहेत. दुसरीकडे उमरेड तालुक्यातील बहुसंख्य बँकांच्या आतापर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकली असता, डझनभर शाखांचा कारभार कर्ज वितरणात ‘ढिम्म’ दिसून येत आहे.

उमरेड तालुक्यात राष्ट्रीयीकृत सरकारी बँकांसह एकूण १७ बँकांच्या ३१ शाखा आहेत. या सर्व बँकांच्या शाखेतून आजमितीस केवळ १,२०३ शेतकऱ्यांना १८ कोटी १५ लाख ५२ हजार रुपयांचे कर्ज वितरित झाले. पीक कर्जाच्या वितरणाबाबत नागपूर जिल्हा सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँकेची उमरेड शाखा आघाडीवर आहे. या बँक शाखेने आतापर्यंत २४१ शेतकऱ्यांना ४ कोटी ४७ लाख १७ हजार रुपयांचे कर्ज वितरित केले आहे.

युनियन बँक ऑफ इंडिया शाखा उमरेडनेसुद्धा समाधानकारक कामगिरी केली. या बँक शाखेतून १७१ शेतकऱ्यांनी पीक कर्जाची उचल केली. एकूण २ कोटी ७६ लाख ४५ हजार रुपयांचा निधी या शाखेतून पीक कर्जासाठी मंजूर झाला. केवळ या बँकांची आकडेवारी इतर बँकांच्या तुलनेत बऱ्यापैकी असली, तरीही पीक कर्ज वितरणाचा वेग फारच मंदावल्याचे दिसून येते. पीक कर्जाचे वितरण याच गतीने झाल्यास हजारो शेतकऱ्यांसमोर अडचण निर्माण होण्याची शक्यता आणि चिंता व्यक्त होत आहे. येत्या काही दिवसात कर्ज मागणीसाठी गर्दी वाढणार आहे. खरीप हंगामासाठी बी-बियाणे, खते आणि कीटकनाशके यासाठी शेतकरी बँकेवर अवलंबून असतात. यामुळे बँकांनी आता योग्यवेळी कर्ज वितरणासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करावी. कर्जासाठी आलेल्या शेतकऱ्यांना तातडीने कर्ज द्यावे, अशी मागणी केली जात आहे.

सहा बँकांच्या शाखेला ‘भोपळा’ 
उमरेड तालुक्यातील सर्व बँक शाखांमधील कर्ज वितरणाचा तपशील घेतल्यानंतर आश्चर्यकारक आकडेवारी पुढे आली. १ एप्रिल ते ३० सप्टेंबर असा खरीप पीक कर्ज वितरणाचा कालावधी असतो. या हंगामात कर्ज वितरणासाठीचा सुमारे दोन महिन्यांचा काळ येत्या काही दिवसात पूर्ण होणार आहे. असे असतानाही एकूण बँकांच्या शाखेने एकाही शेतकऱ्याला एक रुपयासुद्धा वितरित केलेला नाही. वितरणात सहा बँकांच्या शाखेला सध्यातरी भोपळा मिळाला आहे. यामध्ये उमरेड येथील इसाफ, इक्वीटास, यस बँक यासह बँक ऑफ महाराष्ट्र (घोटुर्ली), युनियन बँक ऑफ इंडिया (कोलियरी), युको बँक (सिर्सी) या सहा बँक शाखांचा समावेश आहे. येत्या काही दिवसात या बँकांची कामगिरी सुधारेल, अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत.

ही आकडेवारीही लाजीरवाणीच ! 
काही बँकेच्या शाखांनी पीक कर्ज वितरणात ‘भोपळा’ हा शिक्का पुसला. शून्य संख्या कशीबशी ओलांडली. परंतु, ही आकडेवारीही लाजीरवाणीच ठरावी, अशी दिसून येते. यामध्ये केवळ प्रत्येकी एकच शेतकरी करण्याची कामगिरी एकूण तीन बँक शाखांनी केली. यात बँक ऑफ बडोदा (१ लाख ६० हजार रुपये), एचडीएफसी शाखा सालईराणी (१ लाख ४४ हजार) आणि आयडीबीआय उमरेड शाखेने केवळ ७७ हजार रुपये एकमेव शेतकऱ्याला वितरित केले. आयडीबीआय चांपा येथील शाखेने केवळ तीन शेतकऱ्यांना चार लाख रुपये, एक्सिस उमरेड शाखेने केवळ ४ शेतकऱ्यांना १० लाख ४८ हजार रुपये, आयसीआयसीआय उमरेड शाखेनेही ४ शेतकऱ्यांना ६ लाख ९६ रुपयांचे पीक कर्ज दिले. बँक ऑफ महाराष्ट्र बेलगाव परसोडी शाखेने अर्धा डझन शेतकऱ्यांना ६ लाख ७ हजार रुपयांचे कर्ज वितरित केले आहे.

Web Title: ahead of Kharif season farmers could not get crop loans by banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.