महान येथील धरणाच्यापाणीपातळीत होत असलेल्या वाढीमुळे मंगळवार दि.८ ऑगस्ट रोजी सकाळी ६४.६३ टक्क्यांवर पोहोचता आहे. पातळी काढल्याने धरणातील शेवटचा पाचवा व्हॉल्वदेखील आज रोजी पाण्याखाली गेल्याने अकोलेकरांची चिंता मिटली आहे.काटेपूर्णा धरण परिसरात जोरदार पाऊस होत असल्याने पातळीत झपाटयाने वाढ झाली आहे. मंगळवारी या व्हॉल्व्ह पाण्याखाली गेला आहे. अकोला शहरासह मूर्तिजापूर शहर बोरगाव मंजू अकोला एमआयडीसी, मत्स्यबीज केंद्र महान सह नदीकाठावरील 64 खेडीगावांची वर्षभराची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
- अकोला शहराला पाणीपुवठ्यासाठी महान धरणात एकूण पाच व्हॉल्व्ह बसविलेले असून त्यापैकी चार व्हॉल्व्ह गेल्या पंधरा दिवस आधीच पाण्याखाली गेले होते. शेवटचा अंतिम पाचवा व्हॉल्व्ह पाण्यावरती उघडा होता. आज रोजी पाण्याखाली गेला आहे.
- धरणाचा जलसाठा आज रोजी ६४.५३ टक्क्यांवर पोहोचला आहे. महान धरणाला एकूण दहा दरवाजे आहेत. मुख्य दरवाजावर आज रोजी साडेआठ फुटांपर्यंत पाणी आले असून, पाणीपातळी १०० टक्क्यांसाठी आणखी साडेसात फूट पाण्याची गरज आहे.
शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
नदीकाठावरील परवानाधारक शेतकयांना नोव्हेंबर महिन्यापासून रब्बी हंगामाकरिता महान धरणातून सिंचन व्हॉल्व्हने पाणी नदीपात्रात सोडण्यात येत असते. महान धरण लवकरच ८० टक्क्यांचा आकडा पार करणार असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. वाढत्या जलसाठ्याकडे उपकार्यकारी अभियंता विशाल कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली महानचे शाखा अभियंता पल्लवी नीलगुंडे, कर्मचारी मनोज पाठक, सुखदेव आगे, नाना शिराळे, प्रतीक खरात, अमोल पाटील, भोंबे, सालार खान, गवई, संतापे हे लक्ष ठेवून पाणीवाढची माहिती संबंधित विभागाला वेळोवेळी देत आहे.