Join us

राज्यातील सर्व नाशवंत पिकांचा होणार सर्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2023 12:29 PM

सरकार धोरण आखण्याच्या तयारीत : संस्था नेमण्याचा विचार सुरु

राज्यात कांदा निर्यातीवरून मोठा पेच निर्माण झाला असतानाच आता अशा नाशवंत पिकांचा सर्वे करण्यासाठी एक संस्था नेमण्याचा विचार सरकार करत आहे.

राज्यात कांदा, टोमॅटो, आंबा, द्राक्षे, संत्री यांसारख्या विविध पिकांचे उत्पादन होते. मात्र मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्यास आणि त्यांची तेवढ्या प्रमाणात विक्री न झाल्यास ही पिके सडून उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. यामुळे शेतकरी आणि सरकार दोघांचाही महसूल बुडत असल्याने या सर्व पिकांचा सर्व्हे करून त्यांचे उत्पादन, विक्री आणि ठरावीक कालावधीत अशा पिकांवरील प्रक्रिया याबाबतीत एक धोरण निश्चित करण्यात येणार आहे. याबाबत पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी सूचना केल्याचे समजते. 

नाशवंत पिके कोणती?

पावसाच्या पाण्यावर घेण्यात येणारी पिके ही नाशवंत पिके असून फळभाज्या, पालेभाज्या, फळांचा समावेश होतो. टोमॅटो, कांदा, बटाटे, आले लसूण यासह भाज्या आणि फळांचा यामध्ये समावेश होतो.

 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीपीकपीक व्यवस्थापन