खरीप हंगाम-२०२३ मधील दुष्काळामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. जालना जिल्ह्यासाठी रुपये ३८२ कोटी २१ लक्ष ६९ हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. निधी मिळविण्यात जालना राज्यात दुसऱ्या स्थानावर आहे. बाधित शेतकऱ्यांना या निधीचे वितरण करण्यासाठी याद्या अपलोड करण्याचे काम व निधी वितरणाची पुढील प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याची सूचना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी संबंधित तहसीलदारांना केली आहे.
खरीप हंगाम-२०२३ करिता दुष्काळ जाहीर केलेल्या ४० तालुक्यांमधील खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान वाटप करण्याकरिता शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून एकूण रुपये २ हजार ४४३ कोटींचा निधी वितरित करण्यास महसूल व वनविभागाच्या २९ फेब्रुवारीच्या शासन निर्णयान्वये मंजुरी देण्यात आली आहे.
खरीप हंगाम-२०२३ दुष्काळाने जालना जिल्ह्यातील भोकरदन, जालन बदनापूर, अंबड आणि मंठा य तालुक्यांतील एकूण १ लाख ५६ हजा ५७६ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसा झाले. या नुकसानपोटी जिल्ह प्रशासनाने मागणी केलेल्या निधीनुसा शासनाने रुपये ३८२ कोटी २१ लक्ष ६ हजार इतका निधी मंजूर करण्या आला आहे.
असा आहे जालना जिल्ह्यातील तालुकानिहाय मंजूर निधी
• भोकरदन तालुका बाधित १ लक्ष ९ हजार ६८० शेतकऱ्यांसाठी ९२ कोटी ३३ लक्ष ३५ हजार रुपये मंजूर झाले आहेत. जालना तालुक्यातील बाधित ९१ हजार ४५२ शेतकऱ्यांसाठी ७९ कोटी ९ लक्ष ९० हजार रुपये मंजूर झाले आहेत. बदनापूर तालुक्यातील ४९ हजार ५१० शेतकऱ्यांसाठी ५१ कोटी ९० लाख ६५ हजार रुपये मंजूर झाले आहेत.
• अंबड तालुक्यातील बाधित ९७ हजार ७२८ शेतकऱ्यांसाठी ११० कोटी ९४ लाख ६९ हजारांचा निधी मंजूर झाला आहे. तर मंठा तालुक्यातील बाधित ५८ हजार ८४८ शेतकऱ्यांसाठी ४७ कोटी ९३ लाख १० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.