Lokmat Agro >शेतशिवार > लाडकी बहिण योजनेबरोबरच आता वृद्धांना आली हि योजना

लाडकी बहिण योजनेबरोबरच आता वृद्धांना आली हि योजना

Along with the ladaki bahin yojana, this scheme has now come to the senior citizens | लाडकी बहिण योजनेबरोबरच आता वृद्धांना आली हि योजना

लाडकी बहिण योजनेबरोबरच आता वृद्धांना आली हि योजना

ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाकडून आता मुख्यमंत्री वयोश्री योजना mukhyamantri vayoshri yojana सुरू करण्यात आली आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाकडून आता मुख्यमंत्री वयोश्री योजना mukhyamantri vayoshri yojana सुरू करण्यात आली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

पुणे : ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाकडून आता मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या शारीरिक अक्षमतेनुसार सहाय्य साधने किंवा उपकरणे खरेदी, प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एकवेळ एकरकमी ३ हजार रुपये पात्र लाभार्थ्यांच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरित करण्यात येणार आहे. 

अर्ज कसा करायचा?
■ मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र राज्यातील शिंदे सरकारमार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आली.
■ परंतु अद्याप मुख्यमंत्री वयोश्री योजना ऑफलाइन नोंदणी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
■ शासन निर्णयानुसार राष्ट्रीय योजनेच्या धर्तीवर सदर योजनेचे नवीन स्वतंत्र पोर्टल महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून विकसित करण्यात येणार आहे.
■ ऑनलाइन अर्ज किंवा रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर वेबसाइटवर याबद्दलची माहिती अद्यावत करण्यात येईल.

निकष
■ लाभार्थी व्यक्त्ती महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक म्हणून ६५ वर्षे पूर्ण केलेली असावीत.
■ लाभार्थी व्यक्तींकडे आधार कार्ड किंवा आधार कार्डसाठी केलेला अर्ज, नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे.
■ लाभार्थी अर्जदारांची एकूण वार्षिक उत्पन्न मर्यादा २ लाख रुपयांच्या आत असावी, याबाबत लाभार्थ्यांनी स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे.
■ सदर व्यक्तीने मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था किंवा इतर सरकारी नियंत्रण सार्वजनिक उपक्रमासहित कोणत्याही सरकारी स्रोताकडून विनामूल्य उपकरण प्राप्त केलेले नसावे.
■ पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या ३ हजार रुपये रकमेची उपकरण खरेदी केल्यासंदर्भातील व प्रशिक्षण घेतल्या संदर्भातील प्रमाणपत्र ३० दिवसांच्या आत संबंधित सहायक आयुक्त समाजकल्याण यांच्याकडे प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे.
■ निवड/निश्चित केलेल्या जिल्ह्यात एकूण लाभार्थी संख्यांपैकी ३० टक्के महिला असतील.

ही कागदपत्रे आवश्यक
आधारकार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयीकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे २ फोटो, मोबाइल क्रमांक, अपंग असल्यास प्रमाणपत्र, स्वयं-घोषणापत्र शासनाने ओळखपत्र पाठविण्यासाठी विहित केलेली अन्य आवश्यक कागदपत्रे.

काय मिळणार लाभ?
सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी जास्त नागरिकांना त्यांच्या शारीरिक असमर्थतता व दुर्बलतेनुसार खालीलप्रमाणे उपकरणे खरेदी करता येतील. यामध्ये चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इत्यादी.

Web Title: Along with the ladaki bahin yojana, this scheme has now come to the senior citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.