Join us

लाडकी बहिण योजनेबरोबरच आता वृद्धांना आली हि योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 12:42 PM

ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाकडून आता मुख्यमंत्री वयोश्री योजना mukhyamantri vayoshri yojana सुरू करण्यात आली आहे.

पुणे : ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाकडून आता मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या शारीरिक अक्षमतेनुसार सहाय्य साधने किंवा उपकरणे खरेदी, प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एकवेळ एकरकमी ३ हजार रुपये पात्र लाभार्थ्यांच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरित करण्यात येणार आहे. 

अर्ज कसा करायचा?■ मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र राज्यातील शिंदे सरकारमार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आली.■ परंतु अद्याप मुख्यमंत्री वयोश्री योजना ऑफलाइन नोंदणी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.■ शासन निर्णयानुसार राष्ट्रीय योजनेच्या धर्तीवर सदर योजनेचे नवीन स्वतंत्र पोर्टल महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून विकसित करण्यात येणार आहे.■ ऑनलाइन अर्ज किंवा रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर वेबसाइटवर याबद्दलची माहिती अद्यावत करण्यात येईल.

निकष■ लाभार्थी व्यक्त्ती महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक म्हणून ६५ वर्षे पूर्ण केलेली असावीत.■ लाभार्थी व्यक्तींकडे आधार कार्ड किंवा आधार कार्डसाठी केलेला अर्ज, नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे.■ लाभार्थी अर्जदारांची एकूण वार्षिक उत्पन्न मर्यादा २ लाख रुपयांच्या आत असावी, याबाबत लाभार्थ्यांनी स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे.■ सदर व्यक्तीने मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था किंवा इतर सरकारी नियंत्रण सार्वजनिक उपक्रमासहित कोणत्याही सरकारी स्रोताकडून विनामूल्य उपकरण प्राप्त केलेले नसावे.■ पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या ३ हजार रुपये रकमेची उपकरण खरेदी केल्यासंदर्भातील व प्रशिक्षण घेतल्या संदर्भातील प्रमाणपत्र ३० दिवसांच्या आत संबंधित सहायक आयुक्त समाजकल्याण यांच्याकडे प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे.■ निवड/निश्चित केलेल्या जिल्ह्यात एकूण लाभार्थी संख्यांपैकी ३० टक्के महिला असतील.

ही कागदपत्रे आवश्यक आधारकार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयीकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे २ फोटो, मोबाइल क्रमांक, अपंग असल्यास प्रमाणपत्र, स्वयं-घोषणापत्र शासनाने ओळखपत्र पाठविण्यासाठी विहित केलेली अन्य आवश्यक कागदपत्रे.

काय मिळणार लाभ?सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी जास्त नागरिकांना त्यांच्या शारीरिक असमर्थतता व दुर्बलतेनुसार खालीलप्रमाणे उपकरणे खरेदी करता येतील. यामध्ये चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इत्यादी.