Lokmat Agro >शेतशिवार > Ambadi Tea : विविध आजारांवर मात करणारा आरोग्यदायी अंबाडी चहा

Ambadi Tea : विविध आजारांवर मात करणारा आरोग्यदायी अंबाडी चहा

Ambadi Tea : Healthy flax tea that overcomes various diseases | Ambadi Tea : विविध आजारांवर मात करणारा आरोग्यदायी अंबाडी चहा

Ambadi Tea : विविध आजारांवर मात करणारा आरोग्यदायी अंबाडी चहा

रानभाजी अंबाडीचे अनेक गुणधर्म आहे. या भाजीच्या सेवनापासून विविध आजारांवर मात देखील मिळविता येते. यासोबतच अंबाडीच्याच्या फुलाचा चहा देखील आरोग्यवर्धक आहे.

रानभाजी अंबाडीचे अनेक गुणधर्म आहे. या भाजीच्या सेवनापासून विविध आजारांवर मात देखील मिळविता येते. यासोबतच अंबाडीच्याच्या फुलाचा चहा देखील आरोग्यवर्धक आहे.

शेअर :

Join us
Join usNext

रानभाजी अंबाडीचे अनेक गुणधर्म आहे. या भाजीच्या सेवनापासून विविध आजारांवर मात देखील मिळविता येते. यासोबतच अंबाडीच्याच्या फुलाचा चहा देखील आरोग्यवर्धक आहे. जाणून घेऊया याच चहाची संपूर्ण माहिती. 

अंबाडीच्या लाल रंगाच्या फुलाच्या चहाचे फायदे

अ) अंबाडी चहा मानवी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय गुणकारी आहे.

ब) अंबाडीला येणा-या लाल रंगाच्या फुलांमध्ये औषधी गुणधर्म आहेत.

क) जुना कफ, रक्तदाब नियंत्रण, कोलेस्टेरॉल, मधुमेह, मुत्ररोग, आणि काही प्रमाणात कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारांवर गुणकारी आहे.

ड) अंबाडीत व्हिटॅमिन सी आणि आर्यन मुबलक प्रमाणात असते.

इ) थंड आणि गरम असे कोणत्याही फॉर्ममध्ये चहा आरोग्यदायी आहे.

अंबाडीच्या लाल रंगाच्या फुलाच्या चहाची पाककृती

१) अंबाडीच्या फुलावरचा लाल भाग (लाल रंगाच्या पाकळया) काढुन घ्याव्यात.

२) एका पातेलयामध्ये पाणी घ्यावे, त्यामध्ये ४ - ५ पाकळया टाकाव्यात किंवा लाल रंगाच्या पाकळ्या काढुन चांगल्या प्रकारे वाळवाव्यात (ड्राय कराव्यात) नंतर त्यांची बारिक पावडर करुन घ्यावी व एक चमच पावडर चहा मध्ये टाकावी.

३) नंतर त्यामध्ये अद्रक व आवडीप्रमाणे थोडी चहा पावडर, गुळ किंवा साखर टाकावी.

४) चहा ३ - ५ मिनिट उकळुन घ्यावा व नंतर गॅस बंद करून चहा गाळुन घ्यावा.

डॉ. गरडे ए. पी.
सहायक प्राध्यापक, उद्यान विद्या विभाग
छत्रपती शाहु महाराज शिक्षण संस्था, कृषी महाविद्यालय, कांचनवाडी, छत्रपती संभाजीनगर मो. नं. ८४०८८३८४५०.

प्रा. राठोड बी. एम.
सहायक प्राध्यापक, अन्नतंत्र विभाग
छत्रपती शाहु महाराज शिक्षण संस्था, कृषि महाविद्यालय, कांचनवाडी छत्रपती संभाजीनगर

हेही वाचा - खजुराचे पोषक तत्वे वाचून तुम्हीही म्हणाल; अबब अवघ्या एका खजुराचे किती हे गुणधर्म

Web Title: Ambadi Tea : Healthy flax tea that overcomes various diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.