Lokmat Agro >शेतशिवार > Amla Health Benefits : बलवर्धक आवळा खा; रोगप्रतिकारकशक्ती वाढवा 

Amla Health Benefits : बलवर्धक आवळा खा; रोगप्रतिकारकशक्ती वाढवा 

Amla Health Benefits: Eat strengthening amla; Increase immunity  | Amla Health Benefits : बलवर्धक आवळा खा; रोगप्रतिकारकशक्ती वाढवा 

Amla Health Benefits : बलवर्धक आवळा खा; रोगप्रतिकारकशक्ती वाढवा 

औषध म्हणून आवळ्याचा उपयोग बलवर्धक, केशवर्धक, धातुवर्धक, उंचीवर्धक, दृष्टी सचेत करणारे, रक्तशोधक, त्रिदोषनाशक म्हणून करतात. त्यापासून 'क' जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात मिळते. यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते असे तज्ज्ञ सांगतात.

औषध म्हणून आवळ्याचा उपयोग बलवर्धक, केशवर्धक, धातुवर्धक, उंचीवर्धक, दृष्टी सचेत करणारे, रक्तशोधक, त्रिदोषनाशक म्हणून करतात. त्यापासून 'क' जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात मिळते. यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते असे तज्ज्ञ सांगतात.

शेअर :

Join us
Join usNext

आंबट, तुरट, कडवट अशा चवींनी युक्त असणारा बहुगुणी आवळा नुकताच बाजारात दाखल झाला आहे. या फळाचे सेवन सर्व वयोगटांतील स्त्री-पुरुष करू शकतात. औषध म्हणून आवळ्याचा उपयोग बलवर्धक, केशवर्धक, धातुवर्धक, उंचीवर्धक, दृष्टी सचेत करणारे, रक्तशोधक, त्रिदोषनाशक म्हणून करतात. त्यापासून 'क' जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात मिळते. यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते असे तज्ज्ञ सांगतात.

आवळ्याचे नियमित सेवन केल्यास पचनाच्या तक्रारी दूर होतात आणि मधुमेही रुग्णांना साखरेवर नियंत्रण ठेवणे सोयीचे जाते. डोळ्यांसाठीही आवळा हितकारक आहे.

मधुमेहामुळे होणाऱ्या डोळ्यांवरील परिणामांना आवळ्याच्या नियमित सेवनाने आराम होतो. आवळा हा म्हातारपण दूर ढकलणारा, चेहरा तेजस्वी करणारा, वीर्यवर्धक, पचनक्रिया ठीक राखणारा, ज्वरनाशक, स्नायू तसेच दात मजबूत करणारा, रक्तशोधक, नजर तेज करणारा, केसांना काळेशार व कोमल करणारा आहे. हृदयरोग, मधुमेह, सर्दी, खोकला, स्वप्नदोष, श्वेतप्रदर आदी आजारांवर गुणकारी आहे, असे तज्ज्ञ सांगतात.

मूत्रविकार दूर करण्यात उपयुक्त आवळ्याच्या सेवनाने केस गळायचे

थांबतात. लांब, चमकदार आणि काळेभोर होतात. लोहाबरोबर आवळ्याचा उपयोग कावीळ, अॅनेमिया यांसारख्या आजारांत केला जातो. काही बॅक्टेरियांमुळे लागलेल्या हगवणीत लिंबूरस आणि आवळा यांचे मिश्रण करून सरबत दिल्यास गुण पडतो. याशिवाय बद्धकोष्ठता, हृदयरोग, संधिवात आणि यकृतासंबंधी अनेक आजारांवर आवळ्याचे सेवन करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. सर्व प्रकारच्या मूत्रविकारात आवळ्याचा रस अत्यंत परिणामकारक असतो.

हेही वाचा : Success Story : डाळबट्टी पिठातून उभारला शेती प्रक्रिया उद्योग; पळसगावचा प्रदीप करतोय वार्षिक ५० लाखांची उलाढाल

Web Title: Amla Health Benefits: Eat strengthening amla; Increase immunity 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.