Lokmat Agro >शेतशिवार > Amwala : बहुगुणी गावरान आवळ्याला मिळतेय पसंती; आवळा हेल्दी सुपर फुड

Amwala : बहुगुणी गावरान आवळ्याला मिळतेय पसंती; आवळा हेल्दी सुपर फुड

Amwala : Bahuguni Gavran Amwala is getting preference ; Amla is a healthy super food | Amwala : बहुगुणी गावरान आवळ्याला मिळतेय पसंती; आवळा हेल्दी सुपर फुड

Amwala : बहुगुणी गावरान आवळ्याला मिळतेय पसंती; आवळा हेल्दी सुपर फुड

औषध म्हणून आवळ्याचा उपयोग बलवर्धक, केशवर्धक, धातुवर्धक, उंचीवर्धक, दृष्टी सचेत करणारे, रक्तशोधक, त्रिदोषनाशक म्हणून करतात. त्यापासून 'क' जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात मिळत असून ग्राहकांची आवळ्याला पसंती मिळत आहे. (Amwala)

औषध म्हणून आवळ्याचा उपयोग बलवर्धक, केशवर्धक, धातुवर्धक, उंचीवर्धक, दृष्टी सचेत करणारे, रक्तशोधक, त्रिदोषनाशक म्हणून करतात. त्यापासून 'क' जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात मिळत असून ग्राहकांची आवळ्याला पसंती मिळत आहे. (Amwala)

शेअर :

Join us
Join usNext

Amwala : आंबट, तुरट, कडवट, अशा चवींनी युक्त असणारा बहुगुणी आवळा बाजारात दाखल झाला आहे. या फळाचे सेवन सर्व वयोगटांतील स्त्री, पुरुष करू शकतात. त्यामुळे शहरवासियांची पसंती मिळत आहे. सध्या किरकोळ बाजारात अनेक ठिकाणी आवळ्याची विक्री होताना दिसत आहे.

बाजारात आवळाला मागणी असल्यामुळे आवळा उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होताना दिसत आहे. आवळा ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे जी आधुनिक औषधे बनवण्यासाठी देखील वापरली जाते.  

औषध म्हणून आवळ्याचा उपयोग बलवर्धक, केशवर्धक, धातुवर्धक, उंचीवर्धक, दृष्टी सचेत करणारे, रक्तशोधक, त्रिदोषनाशक म्हणून करतात. त्यापासून 'क' जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात मिळत असून ग्राहकांची आवळ्याला पसंती मिळत आहे.  

वाशिम बाजारपेठेत काही महिला विक्रेत्या वर्षभर गावरान पदार्थ विक्री करतात. प्रत्येक सीझनला त्यांच्याकडे पेरु, बोरे, शेंगा, आवळा, कवळा, शेंगा अशा वेगवेगळ्या पदार्थाची विक्री होते. यामुळे शहरातील ग्राहकांना अस्सल गावरान पदार्थ उपलब्ध होतात.

सध्या बाजारात आवळा विक्रीला आलेला आहे. आवळा सेवनामुळे पचनाच्या तक्रारी दूर होतात आणि मधुमेही रुग्णांना साखरेवर नियंत्रण ठेवणे सोयीचे जाते. डोळ्यांसाठीही आवळा हितकारक आहे.

मधुमेहामुळे होणाऱ्या डोळ्यांवरील परिणामांना आवळ्याच्या नियमित सेवनाने आराम मिळतो आवळा हा म्हातारपण दूर ढकलणारा, चेहरा तेजस्वी करणारा, वीर्यवर्धक, पचनक्रिया ठीक राखणारा, ज्वरनाशक, स्नायू तसेच दात मजबूत करणारा, रक्तशोधक, नजर तेज करणारा, केसांना काळेशार व कोमल करणारा आहे.

'या' आजारांवर गुणकारी

हृदयरोग, मधुमेह, सर्दी, खोकला, स्वप्नदोष, श्वेतप्रदर आदी आजारांवर गुणकारी आहे. त्यामुळे आवळ्याचे नियमित सेवन करावे, असे तज्ज्ञ सांगतात. आवळ्याच्या सेवनाने पचनशक्ती देखील बळकट होईल. आवळा कच्चा, पावडर, लोणचे आणि रस या स्वरूपात खाता येतो.

त्या महिलांमुळे गावरान रानमेवा उपलब्ध !

वाशिम शहरातील पाटणी चौका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे काही महिला रस्त्याच्याकडेला गावरान रानमेवा विक्री करतात. या महिलांकडे बाराही महीने अस्सल गावरान पदार्थ उपलब्ध असतात. यामुळे शहरातील ग्राहकांना अस्सल गावरान रानमेवा उपल्ब्ध होतो.

आवळा फळ नव्हे हे तर सुपर फूड

रोज आवळा खाल्ल्याने आपला चेहरा नैसर्गिकरीत्या चमकतो. त्यात उपस्थित अँटीऑक्सिडेंट त्वचेच्या वृद्धत्वाची समस्या कमी करतात. रस पिण्यामुळे सुरकुत्या आणि फाईन लाईन कमी होतात. हे शरीराला डिटॉक्स करण्याचे कार्यदेखील करते, शिवाय हाडांसाठी आवळा रस फायदेशिर ठरतो.

Web Title: Amwala : Bahuguni Gavran Amwala is getting preference ; Amla is a healthy super food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.