Join us

संत्रा फळ गळतीवर कृषी शास्त्रज्ञांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2023 11:03 AM

संत्राच्या आंबिया बहराची गळती सुरू असल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालेले आहे. तीन वेगवेगळ्या कारणांमुळे ही गळ होत असल्याचा निष्कर्ष कृषी विद्यापीठ, अकोला येथील कृषी शास्त्रज्ञांनी काढला आहे.

महिनाभरापासून संत्राच्या आंबिया बहराची गळती सुरू असल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालेले आहे. तीन वेगवेगळ्या कारणांमुळे ही गळ होत असल्याचा निष्कर्ष कृषी विद्यापीठ, अकोला येथील कृषी शास्त्रज्ञांनी काढला आहे. याबाबत शेतकऱ्यांना व्यवस्थापन सल्ला दिला आहे.

जिल्ह्यात किमान ५० हजार हेक्टरमधील संत्राबागमध्ये आंबिया बहराची गळती होत असल्याचा कृषी विभागाचा नजरअंदाज प्राथमिक अहवाल आहे. या गळतीने झाडांखाली संत्र्यांचा सडा पडला असल्याने, उत्पादकांची चिंता वाढली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारींचा ओघ वाढल्याने काही भागांत भेटी घेतल्या व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठअकोलाचे कुलगुरू यांच्यासोबत चर्चा केली होती.

अ.भा. समन्वय संशोधन प्रकल्पातील कृषी शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, बागेतील उताराच्या दिशेने शेतातील पाणी बाहेर काढावे. पाणी साचून असल्यास तणनाशकाचा वापर करावा. गळलेल्या संत्र्यांची विल्हेवाट लावावी. वनस्पतिशास्त्रीय फळगळतीसाठी एनएए १ ग्रॅम किंवा जिब्रेलिक अॅसिड १.५ ग्रॅमसह एनएटीसीए १ ग्रॅम अधिक ब्रासोनोलाइड ०.४ ग्रॅम अधिक फॉलिक फोसोटिल अॅसिड १० ग्रॅम १०० लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसांच्या अंतराने दोनवेळा फवारणी करण्याचा सल्ला कृषी शास्त्रज्ञांनी दिला आहे. फळगळीमुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. त्यामुळे उपाययोजनांवर त्यांचा भर राहणार आहे.

ही फवारणी आवश्यकबुरशीजन्य फळगळसाठी फोसोटिल एएल २.५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड ५० डब्लूपी २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यामध्ये फवारणी करावी. याशिवाय वाफ्यातही फवारणी करावी. यानंतर पाच दिवसांनी १०० ग्रॅम ट्रायकोडर्मा व १०० ग्रॅम सुडोमोनास एक किलो शेणखतात मिसळून झाडांना द्यावे.

ही आहेत फळगळीची कारणेवनस्पतिशास्त्रीय आंतरिक फळगळीमध्ये पावसाळ्यात सतत पाणी साचल्याने झाडांची मुळे कुजतात. फळांना पेशीक्षय होतो व पिवळी पडून गळतात.बुरशीजन्य फळगळमध्ये फळांच्या देठास बुरशीचे संक्रमण होते. फळांच्या साल व देठावर काळसर तपकिरी डाग पडतात. तो भाग कुजतो व फळांची गळ होते.कीटकजन्य फळगळमध्ये ऑगस्ट महिन्यात फळमाशीमुळे फळगळ दिसून येते व या महिन्याच्या शेवटी रसशोषण करणाऱ्या पतंगाचा उपद्रव होऊन फळगळ होते. 

टॅग्स :फळेशेतकरीशेतीपीकपीक व्यवस्थापनअमरावतीविद्यापीठअकोला