गोवंशीय जनावरांसाठी जीवघेणा ठरलेल्या "लम्पी' त्वचारोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अखेर सोमवारी जनावरांचे बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला. 'लम्पी'ला रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभाग शर्थीने प्रयत्न करत असताना दुसरीकडे बाजाराच्या माध्यमातून जनावरांचे जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा स्थलांतर सुरूच होते.
बाजार बंद करण्याचा पशुसंवर्धन विभागाचा प्रस्ताव असतानाही निर्णय घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे वेळ नाही, यासंदर्भात 'लोकमत'ने सप्टेंबरच्या अंकात वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले. जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सोमवारी जनावरांचे बाजार बंद संदर्भात घेतलेल्या निर्णयाद्वारे जिल्ह्यातील गोवंशीय जनावरांची खरेदी-विक्री जनावरांचे प्रदर्शन, जनावरांची शर्यत व बाजार भरविण्यास प्रतिबंध करण्यात आला.
जनावरांचे २८ दिवसांपूर्वी लम्पी या पाच महिन्यांत १७५८ जनावरांना प्रतिबंधक लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र असल्याशिवाय त्यांची आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत वाहतूक करता येणार नाही. पशुपालकांना लम्पी बाधित जनावरे गोठ्यापासून बाहेर नेण्यास बंदी घालण्यात आली. अजूनही ५०६ जनावरे या आजाराने त्रस्त आहेत.