Join us

Animal Husbandary : पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांना मिळाली पदोन्नती! शासनाचा निवडणुकीच्या तोंडावर निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 18:10 IST

Animal Husbandary : राज्यातील विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर  म्हणजे १५ ऑक्टोबर रोजी हा निर्णय घेतल्यामुळे सर्वांच्या नजरा उंचावल्या आहेत. 

Pune : पशुसंवर्धन विभागातील राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. गट-क वर्गातील सहाय्यक पशुधन विकास अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली असून राज्य सरकारने यासंदर्भातील आदेश काढला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर  म्हणजे १५ ऑक्टोबर रोजी हा निर्णय घेतल्यामुळे सर्वांच्या नजरा उंचावल्या आहेत. 

दरम्यान, पशुसंवर्धन विभागातील सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, गट-क (एस-१०, २९२००- ९२३००) या संवर्गातून पशुधन विकास अधिकारी, गट-ब (एस-१६, ४४९००-१४२४००) या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. या पदोन्नत्या या सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरून देण्यात आलेल्या आहेत. 

Sugar Factory : राज्य सरकार कारखान्यांवर मेहेरबान! ८४ साखर कारखान्यांसाठी १४ कोटींचे व्याज अनुदान

राज्य शासनाने १४ जुलै २०२१ रोजी काढलेल्या आदेशानुसार पदोन्नत होणाऱ्या अधिकाऱ्यांना "महाराष्ट्र शासकीय गट-अ व गट-ब (राजपत्रित व अराजपत्रित) पदावर सरळसेवेने व पदोन्नतीने नियुक्तीसाठी महसूल विभाग वाटप नियम-२०२१ नुसार वाटप झालेल्या संबंधित महसूल विभागात पदस्थापनेचे आदेश निर्गमित केल्यानंतर ३० दिवसाच्या आत हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीदुग्धव्यवसाय