महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्पात शासनाने अन्नपूर्णा योजना जाहीर करण्यात आली, कारण सध्या घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भिडलेले आहेत. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्रता कोणती असणार आहे तसेच या योजनेच्या अटी व शर्ती काय असणार आहेत त्याची माहिती घेऊयात.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेंतर्गत राज्य सरकारच्या वतीने राज्यातील सुमारे ५२ लाखांहून अधिक कुटुंबांना दरवर्षी तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत.
योजनेची घोषणा करताना अर्थमंत्री अजित पवार यांनी महिलांच्या आरोग्याशी संबंधित समस्या कमी करण्यासाठी ही योजना फायद्याची ठरेल असे सांगितले.
अजित पवार यांनी पुढे असे सांगितले की, "स्वयंपाकासाठी वापरले जाणारे इंधन आणि महिलांच्या आरोग्याचा जवळचा संबध असतो. त्यामुळे महिलांच्या आरोग्याच्या समस्या कमी करण्यासाठी त्यांना स्वच्छ इंधन पुरवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात येणार आहे."
स्वच्छ इंधनासाठी एलपीजीचा वापर हा सर्वात सुरक्षित आहे, त्यामुळे त्याचा वापर वाढविणे गरजेचे असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. त्यासाठी राज्य सरकारकडून गॅस सिलिंडर प्रत्येक घराला परवडायला हवा म्हणून, योजनेत पात्र प्रत्येक कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी नुकतीच केली आहे.
या योजनेचा लाभ ५२ लाख १६ हजार ४१२ कुटुंबांना होणार असल्याचे त्यांनी अर्थसंकल्पात सांगितले. तसेच ही योजना पर्यावरण संरक्षण करण्यासाठी मदत करेल.
कोणत्या महिलांना गॅस सिलेंडर मिळणार?
* एका वर्षामध्ये हे तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जातील.
* त्यानंतरची गॅस सिलेंडर जे असणार आहे ते मात्र आहे त्या किमती मध्ये खरेदी करावे लागतील.
* गॅसचे दोन कनेक्शन आहे - घरातील दोन वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे तर मग आम्हाला सहा गॅस सिलेंडर मोफत मिळतील का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
तर याचे उत्तर असे की एका कुटुंबातील सर्व सदस्य मिळून तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जातील तुमच्याकडे कितीही गॅस कनेक्शन असो त्याचा काही या ठिकाणी फायदा होणार नाही.
इथे कुटुंबाची व्याख्या कशी धरणार?
* राशन कार्डवर नमूद घरातील सदस्यांची नावे म्हणजे एक कुटुंब म्हणून ग्राह्य धरले जाईल.
* ही योजनेत दारिद्र रेषेखालील म्हणजेच बीपीएल कार्ड असलेल्या कुटुंबांना विना अडथळा लाभ देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे.
* पिवळे आणि केशरी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबांना देखील या सिलेंडर योजनेचा लाभ मिळणार आहे, परंतु पांढरे रेशन कार्डधारक जे कुटुंब असतील त्यांना या योजनेचा लाभ हा दिला जाणार नाही.
आवश्यक पात्रता :
* मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना २०२४ योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी, तुम्ही खाली नमूद केलेल्या सर्व पात्रता निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे
* फक्त पाच व्यक्ती असलेल्या कुटुंबालाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
* उमेदवार EWS,SC आणि ST चा सदस्य असणे आवश्यक आहे.
* हा उपक्रम केवळ आर्थिकदृष्ट्या वंचित गटातील लोकांसाठीच उपलब्ध आहे.
* प्राप्तकर्त्यांकडे सक्रिय शिधापत्रिका असणे आवश्यक आहे.
* या उपक्रमाचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवाशांना उपलब्ध आहे.
* लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न हे सरकारने लागू केलेल्या उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा जास्त नसावे.
आवश्यक कागदपत्रे :
महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत
* आधार कार्ड
* पासपोर्ट आकाराचा फोटो
* पॅन कार्ड
* उत्पन्न प्रमाणपत्र
* पत्त्याचा पुरावा
* कौटुंबिक आयडी पुरावा
* जात प्रमाणपत्र
असा करा अर्ज :
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र अधिकृत वेबसाइट सरकारने अद्याप अधिसूचित केलेली नाही. एकदा सरकारने अधिकृत वेबसाइट जाहीर केल्यानंतर तेथे फॉर्म भरू शकतात.